STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Others

3  

Vaishnavi Kulkarni

Others

रंग

रंग

1 min
215

एक रंग अल्लडतेचा ,

एक रंग तारुण्याचा !

एक रंग कर्तव्याचा ,

एक रंग प्रीतीचा !

एक रंग पुनर्निर्मितीचा ,

एक रंग ममतेचा !

एक रंग विसाव्याचा ,

एक रंग समाधानाचा !

एक रंग शांततेचा ,

एक रंग पैलतीराचा ! 

जीवनी उधळले जाती जेव्हा हे सप्तरंग , 

आनंदाच्या लहरींचे उठती मनाच्या तळ्यावर तरंग !


Rate this content
Log in