Ujwala Rahane

Others

2  

Ujwala Rahane

Others

रिकामं घर

रिकामं घर

3 mins
95


कधी कधी एकटेपण खायला उठते हो! माधवी माधवरावच्या फोटोकडे बघत बोलत होती.चष्म्यातून फोटोतील माधवराव माधुरीच्या चेहऱ्यावरील हावभाव न्याहळत होते.

  

  काल गौरीचे विसर्जन झाले. त्यांच्याबरोबर गणपती बाप्पा पण निघाले.थांबायला सांगितले तर ते कसले ऐकतात ,निघतो आता प्रवासात कोणीतरी बरोबर लागतं म्हणाले.एकटेपणा झेपत नाही म्हणाले. शेवटी परत माधवी एकटीच. 


  आज माधवीला माधवरावांची प्रकर्षाने आठवण येत होती.बघता बघता माधवरावांना जाऊन दोन वर्षे लोटली.काळ हाच दु:खावर एकमेव औषध आहे.शेवटी जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे राहिलं काय काय?


  मुलंबाळं किती दिवस राहणार ते पण गेली आपापल्या उद्योगाला. 

आई तु पण चल आमच्या बरोबर म्हणून मागे लागले.


 तू एकटी नको राहू,अरे,ज्याला माझ्या एकटेपणाची काळजी नाही वाटली तो गेला.तुम्ही नका काळजी करू.म्हणत माधवीने स्पष्ट नकार दिला.सणवाराला येत चला कुळधर्म कुलाचार मी असेपर्यंत इथेच होऊ दे म्हणून सांगितलं. शेवटी मुलांनी माघार घेतली. 


  एका द्रष्टीने माधवीचं पण बरोबर होतं.मुलांच्या संसारात लुडबुड नको खुपदा नवीन पिढीशी जुळतं घ्यायला मन तयार नसायचं.दुराग्रही स्वभाव नडायचा दुसरं काय?


 आजही मुलगा सून गौरी गणपतीच्या निमित्ताने आठ दिवस येऊन राहून गेली.नातवंडे असल्यामुळे चार दिवस घर गोकूळ झालेलं पण अचानक सगळेच गेले जायला तर हवेच ना?पण आता रिकामं रिकामं वाटतं.


 हि रिकामपणाची पोकळी ना कधी कधी खायला उठते,एपण आपणच ओढवून घेतलं कि सहन तर करावीच लागणार. 

  माधवी भुतकाळात ओढली गेली.आठवले ते फुलपाखराचे दिवस ,अगदी स्वच्छंदी एकमेकांच्या प्रेमात तुडुंब न्हाहलेली.


 घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केले.कालांतराने विरोध मावळला. गोडीगुलाबीने दोन कुटुंब एकत्र आली. आदित्यचा जन्म त्याचं बालपण एकावरच थांबण्याचा माझा अट्टाहास सगळे सगळे माधवने तिचेच ऐकले.

 

 पण या अगदी सगळे मानवला म्हणायचं तु पुरता बाईलवेडा झाला आहे.पण त्याला काही फरक पडायचा नाही. दिवस सरत होते आदित्यचे शिक्षण माधवच्या बढत्या यात माधवी पण पुर्ण गुंतुन गेली.


 दिवस सरत आदित्य शिक्षणपार करून छान सेटल् झाला चांगल्या मुली सांगून येऊ लागल्या. पण आदित्यची वेगळीच डाळ शिजत होती. 


 शेवटी अंतरजातिय विवाहाला मान्यता देऊन माधव माधवी मोकळे झाले.अदित्यचा संसार थाटला.अदिरा गुणाची पोरं लगेच मिक्स झाली.मम्मा मम्मा म्हणून पदराला धरूनच असायची. 

 जिव लावला पोरीने.मग नोकरी निमित्ताने दोघेही मुंबईत स्थिर झाली. मग परत माधव माधवी एकटेच.पण छानच चाललेले त्यांच्या अडीअडचणीला दोघेही जात. काम झाले कि, परत पुण्यात मस्तच चाललेले. 

 कालांतराने आदित्यच्या संसार वेलीवर दोन गोड फुले उमलली. सगळे माधवीने अदिराचे कोडकौतुक केले. सगळे कसे छान चाललेले. 

  पण का नजर लागावी या सुखाला आणि माधवची अचानक Exit सगळे कसे स्वप्नवत.माधवी पुर्ण कोसळली. 


 आजुबाजुला सगळे गोतावळा पण माधवी एकटी पडली.अनंत माधवच्या आठवणीच्या जंजाळात!अदित्य अदिराने आग्रह करूनही ती त्यांच्या बरोबर गेली नाही.एकटे राहणे पसंत केले.

 पण आजकाल वयोमानानुसार एकेक अवयव आठवणी समवेत कमकुवत होऊ लागले.

 मग एकांत पण खायला उठू लागला उगाच आठवणीच्या पसाऱ्यात नवीन आनंदी क्षणाची भर पडायची.मग ती त्यात रमायची मग मन सांगायचं माधवी सोड हेकेखोरपणा!आणि अँडजस्ट करायला शिक!गुणी आहे पोर तुझं रमव नातवंडात मन.


 आताशी तब्येत पण शरीराला वाकुल्या दाखवत होती.खरच मनाला कौल मागवा आणि एकटेपणा घालवावा.

 माधव बरोबरच्या सुखद आठवणी नातवंडांना गोष्टीरुपात सांगाव्यात आजोबांची कहाणी या रूपात.विचार पक्का झाला. 


  माधरावांची मुक संमती स्विकारतं माधवीने आदित्यला फोन लावला. आदित्य येतेय सध्यातरी तुझ्या कडे राह्यला. पुढच्या पुढे बघू!..


Rate this content
Log in