Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Pallavi Udhoji

Others


1  

Pallavi Udhoji

Others


रहदारी समस्या माझी मेट्रो तोडगा

रहदारी समस्या माझी मेट्रो तोडगा

3 mins 407 3 mins 407

भरत नगरात राहणारी प्रियाआज तिची परीक्षा होती. तिचा शेवटचा पेपर होता. बरोबर १० वाजता ती तयार झाली. सगळं सोबत घेतलं आणि आईबाबांना नमस्कार करून ती आपली स्कुटी घेऊन निघाली.११ वाजता तिचा पेपर माउंट कर्नल स्कूल ह्या सेंटर वर होता. बर्डीवर सिग्नल लागल्यामुळे ती थांबली.सिग्नल सुटताच ती निघाली तेवढ्यात मागून येणाऱ्या कारने तिला धडक दिली ती कार तिच्या अंगावरून निघून गेली तिचा जागीच मृत्यू झाला. आजच्या तिच्या शेवटच्या पेपरने तिचाच शेवट झाला. अशा कितीतरी घटना आज नागपुरात घडत आहे. वाढती लोकसंख्या, वाढते वाहन ह्यामुळे रस्त्यावरचे अपघात वाढत आहे आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.


आज घरातून बाहेर पडायच्या आधी घरातल्या लोकांना प्रश्न पडतो, एक प्रकारची धास्ती वाटते ह्याचे कारण रस्त्यावर वाढणारी रहदारी ही समस्या. बाहेर पडताना त्याचा मनात येत की आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचे आहे. गाडीची अवस्था ठीक आहे की नाही. आपल्याला किती वेळात पोहचायचे आहे असे अनेक प्रश्न बाहेर पडायच्या आधी त्यांचा मनात येतात. बाहेर पडताना आपली ही घरच्या मंडळींशी शेवटची भेट तर नाही ना असा भेदक प्रश्न मनाला चटका देऊन जातो. रहदारीच्या विळख्यात माणसाचे आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात गुरफटत आणि फरफटत चालले आहे की त्याची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या एखाद्या अभिमन्यू समान झाली. आज समाजात अनेक व्यक्ती अपघातामुळे त्रस्त आहे त्यात कोणी आपला पाय गमावला, कोणी अपल हात. ह्या समस्येवर उपाय म्हणून आपल्या नागपूर शहरात "माझी मेट्रो" आणण्याचा प्रस्ताव मांडल्या गेला. ही मेट्रो नागपुरात उभारण्यात येणारी "नागपूर मेट्रो प्रणाली" म्हणून गणण्यात येते. ही सगळी कोंडी बघता नागपूर मेट्रो प्रणालीला मंजुरी देण्यात आली.

नागपूर मेट्रोची लांबी ही कमीतकमी ४३ किमी. इतकी असून त्यात एकूण ४२ स्थानके आहेत. तसेच दररोज त्यात अंदाजे प्रवाशाची संख्या ३ लाखाच्या जवळपास असावी. साधारणपणे मेट्रोचा आरंभ २०१९ मध्ये सुरू व्हावा असा अपेक्षित होता पण तो आता २०२० मध्ये सुरू होईल असा वाटत आहे. ट्रायल म्हणून नागपूर ते खापरी पर्यंतचा प्रवास हा सुरू करण्यात आला. माझी मेट्रो ही केवळ उपराजधानी बरोबर काटोल, वर्धा, भंडारा ह्या शहरात मेट्रोचे स्वरूप सत्यात उतरणार आहे. ह्या शहरात माझी मेट्रो रेल्वेच्या ट्रकवर धावताना दिसणार आहे. माझी मेट्रोचा प्रस्ताव समोर आणण्याचा एकमेव उद्देश हा आहे की प्रवाशाचा वेळ वाचावा, वाहतुकीच्या समस्यांपासून दूर, म्हणजे विना अडथळा वाहतूक करता यावी, वायू व वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून दूर, ह्यात इंधन बाचातपन नागरिकांना होणार हा उद्देश तसेच परकीय राज्याच्या सावट, त्यांच्या चलनात बचत होईल हा उद्देश, आणि सार्वजनिक बस वाहतुकीस उत्तम पर्याय म्हणून ही माझी मेट्रो हा पर्याय अगदी उत्तम पद्धतीने जनतेसमोर आणून आपली छाप माझी मेट्रो हिने पाडली आहे.

‌माझी मेट्रोची कारणमीमांसा दृष्टीस पडते. ह्याचे कारण हे की आज नागपूर शहरात राहणाऱ्या जनतेची लोकसंख्या ही अंदाजे २० ते २५ लाखाच्या घरात मोडते. त्यात साधारणपणे ९ तालुके आहे.ती जवळपास ३० लाखाच्या जवळपास आहे. तसेच ह्या शहरात छोटी दुचाकी वाहने, चार चाकी वाहने, तीन चाकी वाहने ह्या सगळ्या वाहनाचा ताण आज नागपुरात प्रवास करण्याचा नागरिकांवर पडत आहे. म्हणुच ह्यावर तोडगा म्हणून नागरिकांनी माझी मेट्रोला पसंती दिली आहे. हा प्रकल्प दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयार केला आहे.


‌माझी मेट्रो ही बाहेरूनच सुंदर नाही तर ती आतूनपण आकर्षक आहे.रेल्वे म्हंटला तर सगळीकडे अस्वचछतेच वातावरण, शौचालयात दुर्गंधी, असे अनेक चित्र दिसत. असे चित्र नागपूर मेट्रोत्त दिसू नये ह्यासाठी प्रत्येक स्थानकावर बायोडियाजेस्तर तंत्रज्ञानाचा अवलंब करून शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो मध्ये ३६ स्टेशन, २ डेपो आणि रेल्वे इमारत असा चित्र बघायला मिळणार आहे.


Rate this content
Log in