Pakija Attar

Others

4.5  

Pakija Attar

Others

रानमेवा

रानमेवा

3 mins
1.3K


गाव जवळ आलं.आरतीला बालपण आठवले. पहाटेची वेळ अंघोळ करून छाया तयार झाली धावतच आरतीच्या घरी आली.

,"आरती चल लवकर शिकोबा डोंगरावर जायचं आहे ना."

"हो हो तयार होते. थांब जरा."आरती म्हणाली.

"दिवस उजडायचय आधी अर्धा डोंगर तरी चढून झाला पाहिजे. चल लवकर."छाया म्हणाली.

दोघी बरोबर चालू लागल्या डोंगराचा पायथा अजून एक कोसभर होता.

फिटे अंधाराचे जाळे याची जणू वाट पाहत होते. त्यांचा अर्धा डोंगर चढून झाला. सूर्यदेवाने दर्शन द्यायला सुरुवात केली. लालसर मंद प्रकाश सगळीकडे पसरला होता. अजून एक डोंगर पार करायचा होता.

त्यानंतर शिकोबाच दर्शन होणार होत. "छाया आलो आपण". आरती किंचाळली.

"अगं येवढे काय ओरडते. तुझा आवाज सगळीकडे दुमदुमला. पहाटेच्या वेळेला सगळीकडे कसं निवांत असतो. त्यामुळे आवाज कुठल्या कुठे गेला. मी घाबरले. मला वाटलं तू घसरली वाटतय. थोडं धीराने घे.


"पटकन दर्शन घेऊया". आरती म्हणाली. "बघ ना डोंगरावरून कसे सगळी गावं सुंदर दिसतात. हिरवीगार धरणी मनमोहन टाकते. असंच पहात रहावे असं वाटते. खरच देवाने किती सुंदर, अप्रतिम निसर्ग बनवलाय. माणूस मात्र याचा आनंद घेतच नाही. फक्त "पळत राहतो."छाया म्हणाली.

बस झाल आता. आपले कोणीतरी वाट पाहतोय बघ. कसा सुर्याच्या लालसर रंगाने वनश्री नटली आहे. वनदेवता आपल्यावर प्रसन्न झाली आहे आपल्याला भरभरून खाऊ देणार आहे. चल पटकन हात जोडून नमस्कार कर. खडीसाखर ठेव. चल निघूया आपला रानमेवा वाट पाहतोय."

"हो गं मी विसरले होते. शिकोबा आमचा नमस्कार स्वीकार कर. आम्ही निघालो.".

दोघेही धावतच निघाल्या. डोंगराच्या दुतर्फा रानमेव्याची झाडे. बोरे, करवंदे गच्च भरलेल्या जाळ्या. दोघी आपल्या ओटीत जमा करत होते. आरती तोंडात करवंदी भरत होती "पिशवीत भर.! खाली पडतील बोरं "छाया म्हणाली.


गुरुवार म्हंटला दोघींचा हाच नियम होता. डोंगरावर जायचं. शिकोबा च दर्शन घ्यायचं. येताना रानमेवा गोळा करायचं. तेवढाच तोंडात भरायचं. आणि घरी येईपर्यंत खात खात संपवायचं. थोडंसं घरी द्यायचं. मग आवरू न शाळेत जायचं .

"चल लवकर आई ओरडेल" छाया म्हणाली.

आई ग आवाज आला. "छाया आजी खाली पडेल, पकड आजीला."आरती म्हणाली. छायाने धावतच आजीला सावरले. आजी थोडी घसरत खाली येताना पटकन पकडले. "आजी लागलं का कुठे? पाहूया लागलंय का. पायाला लागले का? " थोडं खरचटलं होतं.


"आजी तुम्ही थोडक्यात वाचला. नाही तर खोल दरीत गेला असता आजचा दिवस खूप चांगला होता. म्हणून तुमचा जीव वाचला "छाया म्हणाली.

"अगं वरचा बसलाय तो. तो मला कसा दरीत घालवेल? त्याला काळजी माझी.शिखोबाची कृपा."असं म्हणत डोंगराच्या दिशेने हात जोडले. थांबा "आजी आम्ही तुम्हाला घरापर्यंत सोडतो." छाया म्हणाली.

आजीला तिच्या घरी नेऊन सोडले. घरच्यांना सगळं सांगेपर्यंत बराच उशीर झाला होता. आयाबाया जमल्या होत्या. "पोरीन तुम्ही होत्या म्हणून लई बरं झालं"सगळे कौतुक करत होते. त्या धावतच निघाल्या. शाळेत जायचं होतं. आई ओरडणार होती आईला सगळ सांगितलं आईने प्रेमाने जवळ घेतलं "गुणाची ग पोर माझी.."दोघीही शाळेत निघाल्या. पुन्हा पुढच्या गुरुवारी भेटण्यासाठी......

 आरती शाळेत पोचली. सगळ्या मुलींचे लक्ष आरतीकडे होते

"ए आरती"हळूच एक मुलगी म्हणाली. सगळे डोळ्याने खाणाखुणा करू लागल्या. बाई ओरडल्या ".काय चाललंय?"सगळा वर्ग शांत झाला. प्रत्येक जण मधल्या सुट्टीची वाट पाहू लागले. मधली सुट्टी होण्याची वेळ झाली होती. मुलींचे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यापैकी एका मुलीने रानमेवा हळूच म्हणाली."रानमेवा कोण म्हणालं? चल उभे रहा. रान मेवा चा अर्थ सांग."बाई म्हणाल्या.


रानमेवा म्हणजे रानातला मेवा जांभूळ, बोरे, चिंचा, करवंदे. "रमा म्हणाली." अगदी बरोबर"बाई म्हणाल्या. तेवढ्या शाळेची घंटा वाजली. सगळ्या मुली आरतीच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या. "रानमेवा दे आम्हाला.".

"हो हो देते सर्वांना. हे घे करवंदे. हे बोरे घे."

"अग चिंचा कुठे आहे? जांभळे कुठे आहेत?"रमा म्हणाली. "अगं आज नाही आणू शकले. एक आजी डोंगरावरून घसरली. तिला लागले. आम्ही तिला घरी सोडून आलो. वेळच उरला नाही चिंचा व जांभळे पाडण्यासाठी. पुढच्यावेळी नक्की घेऊन येईल."आरती म्हणाली.

"तोंडाला पाणी सुटले होते. पण जाऊ दे. पुढच्या गुरुवारपर्यंत वाट पाहतो. चातक पक्षासारखे.""सगळ्या मुलीं रानमेव्याचा आस्वाद घेऊ लागले.


Rate this content
Log in