MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational Others

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational Others

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

5 mins
164


स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ मासाहेब


    जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी.... या उक्तीप्रमाणे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पूर्ण विश्वामध्ये एक कर्तबगार स्त्री म्हणून ओळखल्या जाते जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नांव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव होते. जिजाऊंना अगदी लहान वयात मध्येच वयाच्या दहाव्या वर्षी सर्व शिक्षणामध्ये पारंगत झाल्या होत्या. त्यांना अनेक भाषा त्याकाळी अवगत होत्या. सर्व युद्धकलेचे शिक्षण जिजाऊनी घेतले होते. अख्या विश्वामध्ये एका वीर पुरुषाची वीर आई म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब ओळखले जातात.... जिजाऊंना युद्ध शिक्षण, राजनीति, भाषा, अनेक खेळ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रात पारंगत केले होते. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला....


      त्या काळामध्ये महाराष्ट्रावर आदिलशहा, निजामशहा यांच्या स्वा-या होवून लढाया होत होत्या.तो काळ फार अंधाधुंदीचा होता.जिकडे तिकडे स्वैराचार माजला होता.स्त्रीया सुरक्षित नव्हत्या,ना रयत सुरक्षित होती...ते रयतेवर जुलूम करायचे.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता.हे सर्व पाहून जिजाऊंना सतत वाटायचे आपले स्वराज्य निर्माण करायचे....शहाजी राजांची साथ होतीच. बाल शिवबाला अगदी लहान वयापासूनच जिजाऊंनी शूरवीरांच्या,रामाच्या, महाभारताच्या ,भिमाच्या, अभिमन्यू च्या कथा सांगितल्या. न्याय-निवाडा कसं करायचं छत्रपती शिवरायांना जिजाऊ सांगत असत इतकंच नाही तर त्यांना अगदी लहान वयापासून झाडावर चढणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे धावत्या घोड्यावर बसणे,तलवारबाजी चालवणे इत्यादी युद्ध कलेमध्ये निपून करण्यासाठी जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना शिकवायच्या... त्यांचे शिक्षण त्यांना येणाऱ्या सर्व भाषा याकडे सुद्धा लक्ष द्यायच्या अगदी लहान वयापासूनच न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शिवबांना गादीवर बसवायच्या.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत....एवढेच नाही तर जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणायच्या भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र..... श्रीरामचंद्रांनी दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधव यांचे पूर्वज श्रीकृष्ण त्यानेसुद्धा दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरूप यायचा... रामकृष्ण,भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा लढावे त्यांनी दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करावा आणि प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटायचे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे....


       शहाजीराजे निजामशाहीत लढाया करत वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानगा शिवबा शिकत होता. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना संस्कृतमध्ये तरबेज केले. त्याचबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात मावळे ठेवले अंदाधुंदी चा काळ संपला आणि जिजाऊ शिवराय शिवनेरीच्या मातीत बाल शिवबा खेळत जिजाऊ पुण्यात राहू लागल्या आसपासच्या लोकांना ते समजले आणि त्या लोकांना मोठा धीर आला. जिजाऊनी सर्व लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. अनेक लोक पुण्यामध्ये येऊ लागले आणि शेतावर जाऊ लागले जिजाऊनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले गाव लोकांनी गजबजू लागले अंधश्रद्धेच्या भीतीने लोकांनी गाव सोडून गेलेले होते पुण्यामध्ये काही कर्मट लोकांनी एका विशिष्ट जागेवर पहार रोवून त्याला फाटकेतुटके खेटर, फाटका झाडू बांधून टाकले होते. याशिवाय जाहीर दवंडी दिली होती की या भूमीवर कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निर्वंश होईल. अशी अंधश्रद्धा त्या काळामध्ये पसरवली गेली होती. या धार्मिक दहशतवादाला व अंधश्रद्धांना जिजाऊंनी प्रथम लाथ मारली....सोबत तरुण मावळ्यांची पोरं एकत्र करून ती पहार जिजाऊने उपटून फेकले आणि त्याच जागेवर सोन्याचा नांगर लावून ती जागा ताब्यात घेतली.... आणि या जागेवर लाल महाल बांधला अंधश्रद्धांना फाटा देणाऱ्या कर्मकांडांना लाथाडून अंधश्रद्धेमध्ये अडकवून ठेवणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला... राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये अनेक स्त्रिया पतीचे निधन झाले की त्याच चितेमध्ये उडी मारून आपला जीव द्यायच्या.... सती जात होत्या अशा स्त्रियांना सती जाण्यापासून विरोध केला त्यांना रोखलं आणि अशा स्त्रियांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या मुलाबाळांत घालवण्यासाठी आवाज उठवला...प्रचार सुरू केला अशा लोकांचे उद्बोधन केलं....कोणाला ही पती वारल्यानंतर जास्त गरज ही आधाराची,मायेची असते हे समजून सांगितले....कितीतरी बहिणींना त्यांच्या मनाविरुद्ध सती जायला भाग पाडणा-या भटांचा खरपूस समाचार घेतला..आणि कितीतरी लहान मुलांना त्यांची आई मिळवून देत अशा अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींना थारा न देता अशा गोष्टींचा प्रखर विरोध करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ह्या त्या काळातील एक धाडशी, धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री म्हणून आदर्श आहेत.


त्या काळांमध्ये अंधश्रद्धा लाथाडून दिली नसती तर कदाचित आजचे पुणे शहर हे त्या जागी कधीच बसले नसते. एक शापित भूमी मधून राहिले असते बाल शिवबाला तयार करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी सर्व प्रकारचे बळ एकत्रित केले अनेक किल्ले घेण्यासाठी बाल शिवबांना प्रवृत्त केलं एक-एक किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा विचार घ्यायचे आणि त्या अनुषंगाने लढाया करायचे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणायच्या "स्वराज्याची किल्ले ही आपली खाजगी मालमत्ता नाही" याची प्रखर जाणीव त्यांनी करून दिली जिजाऊने राजनीतीचा अवलंब करून शहाजीराजांची मुक्तता केले आणि स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं" असं शिवाजी महाराजांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी कोणतेही नाते, कोणतीही भिंत नाही स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचे एकमेव स्वप्न ठरले होते. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी निर्माण केला होता. अशा प्रचंड जिद्दीची व करारी बाण्याची जिजाऊ स्वराज्यनिर्मितीसाठी तयार झाली. शिवबा तयार नसते तर स्वतःच्या हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली असती. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊ माँ साहेबांच्या मध्ये होता एकवटला होता. त्यासाठी त्यांनी राजनीतीचा अवलंब करून स्वराज्याचा पसारा वाढवत गेल्या. सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून शिवबाचे एकूण आठ विविध कुटुंबात वैवाहिक संबंध जोडले.... त्यामुळे आठ शूरवीर घराणे भोसले घराण्यांशी जोडले गेले पुण्याच्या नैऋतेला 64 किलोमीटर वर कानद खो-यात तोरणा किल्ला जिंकला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले....

     अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबास प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पाठवणा-या जिजाऊ ह्या खरंच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून अख्ख्या विश्वाला वंदनीय अशाच आहेत त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा अफजलखानाला कडून जर तुला काही दगाफटका झाला तर आम्ही बालशंभूला गादीवर बसून राजकारभार करेन. इतकी धाडसी,कर्तुत्वान स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.


    "हीच जिजाऊ जीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्यज्योती  

     हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती"


    याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये व बाल संभाजींना घडवण्यामध्ये त्यांना आकार देण्यामध्ये राजमाता वीर माता जिजाऊ मासाहेबांचा हात आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी पन्हाळगडावर बुधभुषण नावाचा संस्कृत,राजकीय सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ लिहिला शंभूराजांनी एकूण चार ग्रंथ लिहिले एवढा प्रचंड बुद्धिमान भाषापंडित शूरवीर,करारी, मुत्सुद्दी, बुद्धिवान, निर्व्यसनी, जिद्दी छत्रपती संभाजीराजे तयार केले त्यांना सर्व शिक्षण माँसाहेब जिजाऊंनी दिले एवढेच नव्हे तर आपली नातसून म्हणजेच महाराणी येसूबाई यांना सुद्धा धर्मनीती, राजनिती,संस्कृत, युद्धनीती या सर्व बाबीवर या सर्वांचे शिक्षण जिजाऊंने दिले होते. छत्रपती संभाजी राजांनी नखशिक, सातसतक नायिकाभेद या तीन ग्रंथांची रचना केली. शंभुराजासारखा आदर्श, कवी,साहित्यिक,पहिली तोफ निर्माण करणारा, शूरवीर, पराक्रमी,मुद्सुदी ,एकही लढाई न हारणारा, आदर्श राजा शोधुनही सापडणार नाही....

    अशा साहसी,धाडसी, कर्तृत्ववान , वेळप्रसंगी हाती तलवार धरून अन्यायाचा प्रतिकार करणा-या आदर्श मातेचा आदर्श समस्त स्त्रीयांनी घेण्यासारखा आहे....

माँसाहेब जिजाऊ जयंती च्या सर्वांना मनःपूर्वक शिव शुभेच्छा.....


Rate this content
Log in