राज, पोहणे व शिकवण...
राज, पोहणे व शिकवण...
राज उन्हाळी सुट्टीत आपल्या मामाच्या घरी आला. राजच्या मामाचे घर एका छोटयाशा गावात होते. पण गाव मात्र सुंदर, गावालगत एक नदी होती, गावात एक जुना किल्ला देखील होता. गाव छोटे असल्यामुळे सगळेजण एकमेकांना ओळखत असत व त्यात हा राज वर्षातून पाच ते सहा वेळेस मामाच्या घरी येत असे, त्यामुळे गावात असं कोणी एक उरले नव्हते जो राजला ओळखणार नाही.
या वेळेस राजला सुट्ट्या जास्त होत्या म्हणून राज पूर्ण दोन ते अडीच महिने मामाच्या घरी राहणार होता. एकेदिवशी राज मामाची परवानगी घेऊन नदीकाठी निघाला. नदीकाठी आल्यावर राजला पोहण्याची इच्छा झाली,पण राजला काही पोहता यायचे नाही. मनात इच्छा पण पोहता येत नाही तरी पण राज नदीत शिरला. थोड्या वेळातच त्याला जाणवले की आपण बुडत आहोत, त्याने लगेचचं वाचवा वाचवा अश्या आरोड्या मारायला सुरुवात केली.
राजच्या आरोड्या एका लाकूड तोडणाऱ्या (गावकरी) माणसाला ऐकू आला, आवाज ऐकताच त्याने अंदाज लावला की नक्की नदीत कोणीतरी बुडत असणार. तो लगेचच पळत नदीकाठी आला व त्याने बघितले की हा तर राज आहे आपल्या दिनेचचा(राजचे मामा) भाचा आहे. त्यांनी लगेच पाण्यात उडी टाकली व त्याला पाण्याच्या बाहेर काढले.
राजला त्या माणसाने तात्काळ त्याच्या मामाच्या घरी आणले, राजला ह्या अवस्थेत पाहताच दिनेशने चौकशी केली, त्या माणसाने घडलेली सर्व हकीकत सांगितली.
दिनेशने राजला दवाखान्यात नेले, थोड्याच वेळात राज शुद्धीवर आला.डॉक्टर म्हणाले घाबरण्यासारखे काही नाही फक्त त्याला पोहता येत नाही म्हणून त्याचा जीव घाबरून तो बेशुद्ध झाला होता. दिनेश म्हणाला माझेच चुकले मी त्याला एकटे नदीवर जायची परवानगी द्यायला नको होती.
या सर्व घटनेतून राजला वेगळीच शिकवण मिळाली होती. राजच्या उन्हाळी सुट्ट्या या वेळेस जास्त असल्यामुळे त्याच्या मामाने त्याला शहरात चांगला पोहण्याचा क्लास लावून दिला. पुढच्या उन्हाळी सुट्टीत राज चांगल्याप्रकारे पोहू लागला...
तात्पर्य :- अनुभवाशिवाय काही एक करता येत नाही.
