STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पुस्तक आणि माणसे फरक

पुस्तक आणि माणसे फरक

2 mins
7

*पुस्तकापेक्षा माणसे वाचताना अधिक सोपी जातात.*

 माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिले की माणसाचा चेहरा काय बोलतो? डोळे काय बोलतात? त्याचे हावभाव काय आहेत? यावरून माणसाच्या मनातील खळबळ आपल्याला समजते. तसे पुस्तकाचे टायटल वाचून त्यामध्ये काय आहे याचा अंदाज येऊ शकतो पण परफेक्ट आपण समजू शकत नाही की या पुस्तकात हेच आहे आणि ते पुस्तक वाचल्याशिवाय आपण त्याचे अवलोकन करू शकत नाही. पण माणूस समोर उभा राहिला आहे आणि त्या माणसाच्या देहबोली वरून सुद्धा आपण माणूस हा वाचायला शिकतो. उदाहरणादाखल काही चेहरे- 1) अत्यंत आनंदी चेहऱ्यावरती हसू लपलेले असते चेहऱ्यावरच हास्य लपलेले आहे म्हटल्यानंतर आपल्याला जाणवतं की हा माणूस खूप आनंदी आहे आणि त्याच्या मनात आता काय चालले आहे. तो आपल्याला याबद्दल सांगतो देखील. 2) एखाद्याचा चेहरा खूप दुःखी आहे त्याच्या डोळ्यातून आसू गाली ओघळताना देखील आपण पाहतो. अशावेळी हा माणूस किती दुःखी कष्टी आहे, कशावरून हे त्याच्या सांगण्यावरून आपल्याला समजते.याला नेमका काय प्रॉब्लेम आहे ते समजते. पण त्याचा दुःखी कष्टी चेहरा आपल्याला सांगून जातो की त्याला अतिशय वेदना झालेल्या आहेत, दुःख झालेल आहे. 3) एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो पण त्याची नजर भिरभिरती असते चेहरा सारखा इकडे तिकडे मान वळून बघत असतो त्यावेळी आपण समजून जावे की त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ चालू आहे.हे मनातील बदल शांत करण्यासाठी त्याला कोणीतरी व्यक्ती हवी असते जवळची. 4) एखाद्या व्यक्तीच्या सुखदुःखाच्या वेळी जर त्याची प्रेमळ व्यक्ती त्याला भेटली अचानक येऊन भेटली तर तो त्या व्यक्तीच्या गळ्यात पडून आपले सुखदुःख शेअर करतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की पुस्तक आपण वाचल्याशिवाय कळत नाही, पण माणूस हा चेहऱ्याच्या हावभावावरून आपल्याला समजतो. काही माणसं आपल्याला अशी मिळतात की त्यांच्या मनात काय युद्ध चालू आहे हे अजिबात आपल्याला समजत नाही. त्यांच्या मनाच्या विचारांचे काहूर गुपित,गुढ असते. असा माणूस झटकन ओळखता येणे कठीण होते. मित्र म्हणवणारे चांगले मित्र सुद्धा एखाद्याचे खूप छान चालले असेल तर त्याचा पाय खेचण्याला मागे पाहत नाहीत. प्रसंगी त्याच्यावर वार देखील करतात अशिही काही उदाहरणे आपण बघितलेली आहेत. आपल्याला माणसे भेटतात ती कधी चांगली भेटतात कधी वाईटही भेटतात. आपण चांगल्या माणसांच्या समवेत राहून आपण त्यांच्या चांगले विचार घेऊया. वाईट माणसांच्या संगतीत राहिलो तरी त्यांच्या चांगलेच विचारांचे अनुकरण करूया. आत्तापर्यंत माझे विचार असे होते की जो समोरचा वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायला हवं पण आता जरा कालांतरांन माझी मत बदलत चालली आहेत की समोरचा वाईट वागला तर किमान त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही खूप वाईट न वागतात ऍटलिस्ट त्याला जाणवेल इतकं तरी आपण त्याच्याशी तुटक वागावं असं जरा आता माझे मत परिवर्तन होत चालले कारण समाज हल्ली खूप बदलत चाललेला आहे पहिल्यासारखा समाज राहिलेला नाही सांगण्याला चांगलं राहायचंच आहे पण वाइटशी चांगलं राहून त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा घडवता आल्या तर वेल अँड गुड नाही तर त्याच्यापासून चार हात दूर असा पण वागायचं. आजचा लेख... वसुधा नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in