Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

पर्यावरणाचे महत्त्व

पर्यावरणाचे महत्त्व

1 min
253


एक गाव होते त्या गावात एक अत्यंत प्रामाणिक व इमानदार शेतकरी राहत होता. त्याला दोन मुले होती एक मुलगी व एक मुलगा अशी होती. मुलीचे नाव नमृन तर मुलाचे नाव नामदेव होते. हे शेतकरी दररोज काबाडकष्ट करायचे आणि आपली उपजिवीका भागात असे.

    या शेतकरी यांची पत्नी घरातील जागेत काही झाडांची लागवड केली होती.दररोज त्यांनी त्या झाडाला पाणी घालून झाडांची जोपासना करीत असत. नमृता नावाप्रमाणेच नमृ होती आणि दुसऱ्यांची काळजी घेणारी होती. प्राणी, पक्षी आणि झाडाबद्दल तर विशेष प्रेम होते. त्यांच्या घरी आईने लावलेल्या झाडांची निगा नमृता स्वत: घ्यायची.

     त्या झाडावर येणाऱ्या कीटकांची, पक्षांची ती निरीक्षण करायची. कितीतरी नवीन गोष्टी तिला कळायच्या. शाळेत दर आठवड्याला एक तास पर्यावरणाचा असायचा.एक नवीन प्रोजेक्ट तयार करायला लागायचा.कधी बी यातून उगवणारे झाडाचे निरीक्षण करायची तर कधी वेगवेगळ्या आकाराची पाने गोळा करायची, कधी जवळच्या शेतात पेरणी, कापणी पहायला जायची. तर कधी पक्षाचे निरीक्षण करायची.       

या आठवड्यातला त्यांचा प्रोजेक्ट अगदी वेगळा होता.पाच जून ला जागतिक पर्यावरण दिन असतो. त्याची तयारी तिच्या स्वाती टीचर ने करून घेतली होती. त्याची सुरुवात मार्च महिन्यापासूनच झाली होती. नमृता या दिनानिमित्त चांगला प्रोजेक्ट तयार केली होती. आणि या दिवशी तिचा प्रोजेक्ट सर्वात प्रथम आला होता.

      चांगले बक्षीस तिला देऊन गौरवण्यात आले होते.. हे पाहून तिचा अगदी चोहीकडे आदर्श मुलगी म्हणून गौरविण्यात आले. तिचे कौतुक फार चांगल्याप्रकारे होत होते..... 


Rate this content
Log in