Revati Shinde

Others

3  

Revati Shinde

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
212


"अगं बेबी काय करतेस?"

"काही नाही ग मावशी ही फांदी कापून टाकते, बघ ना येता जाता नुसती वाटेत येते."

"अगं,मग ती बांधून ठेव, कापायला कशाला हवी?. बेबी हे झाड तुला किती छान फुले देते आणि त्याला अशा वेदना देताना तुला काहीच कसं वाटत नाही"

"मावशी,अगं झाडाला कसल्या आल्यात वेदना."

"बेबी तू शाळा शिकलीस ना, अगं ते पण सजीवच आहेत, आपल्यासारखेच या पर्यावरणाचे मुख्य घटक आहेत किंबहुना आपल्या पेक्षा जास्त महत्त्वाचे घटक आहेत.

" मावशी"

" हो बेबी, झाडे नसतील तर आपलं कसं होईल, आपल्याला खायला अन्न कुठून मिळेल, राहायला घर बांधता येईल का ,अगं झाडांमुळे ऑक्सिजन ,वारा पाऊस ,औषधे मिळतात."

 "जंगलांमध्ये कितीतरी जीवजंतू आहेत ते सर्व या पर्यावरणाचे घटक आहेत त्याची शान आहेत. त्यांची संख्या कमी झाली तर पृथ्वीची शोभा नष्ट होईल आधीच माणसाने प्रदूषणाचा भस्मासुर केलाय, काँक्रीटचे जंगल करून पृथ्वीचे अलंकार उतरवलेत. अशा छोट्या-छोट्या कृतीतूनच आपण पर्यावरण नष्ट करतो हे लक्षात घे. पर्यावरण स्वच्छ असेल तर आपण निरोगी राहू, सुंदर आयुष्य जगू. पर्यावरण टिकले तर आपण टिकू म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर गरजेपुरता करणं हे आपलं कर्तव्य आहे .आले का ध्यानात"

"हो मावशी, सॉरी यापुढे मी हे नेहमी लक्षात ठेवेन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करेन"

"वाह छान ".

 "काय करतेस बेबी"

"अग, त्या पिंजरयातल्या पोपटाला सोडून येते त्यालाही पर्यावरणात मुक्तपणे संचार करू देत की."

"शाब्बास बेबी".



Rate this content
Log in