STORYMIRROR

krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

प्रवास

प्रवास

4 mins
1.9K


आपल्या स्वतःच्या ठिकाणाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं असतो तेथे जाण्याचा आपला उद्देश पूर्ण होतो त्यालाच आपण प्रवास म्हणतो. असा प्रवास आपला कितीतरी प्रकारचा असतो. सर्वसामान्य प्रवास आपण तात्पुरत्या स्वरूपाचा आणि कायम स्वरूपाचा प्रवास करतो. तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवास म्हणजे जिथे आपण राहतो तिथून आपण काही ठिकाणी काही उद्देशासाठी , आपल्या गरजा साठी प्रवास करतो, आपले उद्देश आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपल्या मूळस्थानी येतो. त्यालाच तात्पुरता स्वरूपाचा प्रवास म्हणतात. पण कायमस्वरूपीचा प्रवास म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात आपलं कायमस्वरूपी गरजा आपले उद्देश ती पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी ये जा चालू असते त्यालाच कायमस्वरूपी प्रवास म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला देशा देशातून तात्पुरत्या स्वरूपात

 प्रवास करतात, दर्शन झाला की ते मायदेशी परततात . पण शहरातच मायदेशी प्रती शिर्डी साईबाबाचे मंदिर असल्यावर ते तिथल्या तिथेच साई बाबा च्या दर्शनाला कायमस्वरूपी प्रवास करून दर्शन घेतात म्हणजेच हे कायमस्वरूपी प्रवास करतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर खेड्यातून आपण शहरात उदरनिर्वाहासाठी नोकरीधंद्यासाठी येतो , व परत खेड्यात पीक पाण्यासाठी, शेतीभाती साठी किंवा सणासाठी परत खेड्यात जाण्यासाठी प्रवास करतो हा प्रवास आपला तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. पण शहरात उदरनिर्वाहाचा ठिकाण कायम असल्याने खेडे ते शहर प्रवास कायम स्वरूपाचा होऊन जातं. पण पुण्यातले प्रवासी मुंबईत सर्विस करतात ते सकाळीच पुण्याहून नोकरीसाठी मुंबईला येतात आणि संध्याकाळी ड्युटी संपली की परत पुण्याला येतात म्हणजेच हा रोजचा प्रवास झाला. आपण त्या धर्मस्थळा साठी प्रवास करतो आणि आपले धार्मिक कार्य पूर्ण करण्याचा उद्देश पण पूर्ण करतो म्हणजेच या प्रवासाला आपण यात्रा ही म्हणतो. जगाची माहिती भूगोलात आणि इतिहासात येण्यासाठी त्या त्या वेळचे संशोधक, तज्ञ ,अभ्यासक इत्यादी थोरामोठ्यांची मदत मिळाली, त्यातल्या काहीकांनी जगभर प्रवास करून जगाची माहिती मिळवली होती म्हणून तर आपल्या सगळ्यांना सहजपणे जगाची माहिती मिळते पण हा सारा श्रेय प्रवास करू शकल्यामुळे झाला. त्यामध्ये पोर्तुगीज वास्को दि गामा याने भारताचा शोध लावला होता. म्हणून तर  त्यामागे त्याचं प्रवास करण्याच्या सातत्यानं त्याला भारताचा शोध घेण्यात यश आलं होतं. आपण पर्यटक बनवून देश-विदेशात प्रवास करतो पण त्यामुळे देश-विदेशातील संस्कृती त्यांची परंपराही कळून येतं, राष्ट्रीय एकोपाही साधला जातो आहे, जगातल्या एकाहून येक प्रिय प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळते ते स्थळ आपल्याला बघता येतात आणि त्या स्थळावरून आपल्याला पूर्वीच्या इतिहासाची माहिती मिळते, पर्यटन केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत आर्थिक भर पण पडते,

        अनादिकालापासून तर आतापर्यंत मानवाने त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या

भावी पिढीसाठी जगभरातून प्रवास केलेला आहे,

प्रवास म्हटल्यानंतर माणूस आपला प्रवास आपल्या प्रगतीसाठी,आर्थिक उन्नतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करीत असतो.

तो तर प्रवास करीत असतो पण त्याच्याबरोबर त्याच्या आयुष्याचा पण प्रवास होत असतं या प्रवासा नुसार त्याच्या ह्या जीवन प्रवास अनुसार त्याचा जीवनाचा इतिहास आपल्याला पहावयाला मिळतो. 

माणूस जन्म घेतल्या पासून तर मरे पर्यंत जिवंत राहण्याचा जीवन प्रवास चालूच राहतो, पण एक हे पण आहे ज्यांनी आपला जीवन प्रवास कोणाला दुःख न देता, कोणाला त्रास न देता, स्वतःचं व लोकांचं भलं होण्याकरता आपलं जीवन प्रवास सत्कारणी लावलं व्यवस्थित रित्या पार पाडलं तर जगात त्याचं इतिहास रूपात नाव राहतं  

बरेच संत-महात्मे थोर पुरुष थोर व्यक्ती नेते अभिनेते यांचीही उदाहरणे आहेत

 जसं आपल्या प्रगतीसाठी कष्टाशिवाय पर्याय नसतं तसं प्रवासा शिवाय स्वतःची ओळख व्हायला, अध्यात्मिक उन्नती व्हायला पर्याय नसतो, 

आपल्या भारतातील चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची ओळख व्हायला त्यासाठी त्यांना 

कोणकोणत्या अडीअडचणीच्या प्रवासातून जावं लागलं हे भारतीयांना,त्यांच्या प्रेक्षकांना माहीतच आहे, आपल्या जीवन प्रवासाचा उपयोग आपल्या मुलांना होतो पण तो तात्पुरता असतो पण शेवटी आपल्या जीवन प्रवासाची प्रगतीसाठी स्वतःलाच स्वतः कष्ट घ्यायचे असतात, प्रयत्न करायचे असतात आपली ओळख तयार करायचे असते. आपल्या महानायकाला सुद्धा सुरुवातीला आपल्या वडिलांच्या ओळखीचा उपयोग झाला होता. अमिताभ बच्चनजीचें वडील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चनजी त्यांनी आपल्या जीवन प्रवासात कविता लिखाणाला महत्त्व दिले मेहनत घेतली आणि वाचकांना भावेल अशा कविता लिहिल्या व त्या कविता सगळीकडे प्रसिद्ध झाल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवन प्रवासात आपल्या कुवतीनुसार प्रयत्न करायचा असतो त्याच्या या आयुष्याच्या प्रवासात त्याला त्याच्या कष्टाने यश मिळते प्रगती होते प्रसिद्धी मिळते. अमिताभजी बच्चन त्यांच्या जीवन प्रवासात हिंदी फिल्म सृष्टीत अभिनयात महानायक झाले तेच त्यांचे वडील हरिवंशरायजी बच्चन यांच्या जीवन प्रवासात सुप्रसिद्ध कवी झाले. कलेच्या प्रवासात दोघांच्या जीवन प्रवासामध्ये पित्याने काव्य कलेच्या प्रवासात बाजी मारली तर मुलाने अभिनय कलेच्या प्रवासात बाजी मारली. म्हणजे प्रवास या शब्दाला सुद्धा फार महत्त्व आहे आपण पण आपल्या भविष्याबद्दल आपल्या जीवनाचा जीवन प्रवासाचा उद्देश ठेवला पाहिजे कारण जीवनाच्या या प्रवासात सुखदुःख अडीअडचणी येतातच आणि आपण त्याविरुद्ध लढून आपल्याला आणखीनच कार्यशील, क्षमता शील बनवतात व यासाठी आपल्याला देखील प्रयत्न करायचे असतात तरच आपला प्रवास कार्य साध्य होतो मग तो जीवनाचा प्रवास, मग तो फिरण्याचा प्रवास असो, की मग तो यात्रा करण्याचा प्रवास असो, की मग तो जग फिरण्याचा प्रवास असो. म्हणून तर प्रवास हा प्रवासच असतो.


Rate this content
Log in