प्रत्येकाचं आयुष्य
प्रत्येकाचं आयुष्य
या सुंदर पृथ्वी वर माणसाचा जन्म झाला हे त्यांचे परम भाग्यच! माणूस कितीतरी पुण्य केल्यानंतर त्याला या पृथ्वीवर जन्म मिळतो असे ऐकिवात आहे. माणूसाचा जन्म झाल्यानंतर तो माणसाप्रमाणे वागला पाहिजे. माणुसकीने वागला पाहिजे.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. माणूस हा सर्व प्राणीमात्रांवर प्रेम केले पाहिजे. स्वार्थ प्रत्येकाला आहे, पण आपल्या स्वार्थाबरोबरच इतरांनाही स्वार्थ जपला पाहिजे. माणूस हा असे जगला पाहिजे की आपण जगत असताना इतरांना त्रास होणार नाही .असे वागले पाहिजे. कारण आयुष्य म्हणजे काय तर याची सुंदर अशी व्याख्या सांगितली आहे, ती अशी माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चा कालावधी म्हणजे त्याचे आयुष्य होय.
आणि या कालावधी मध्ये तो कसा वागला पाहिजे हे अतिशय म्हत्वाचे आहे. या त्यांच्या आयुष्याच्यात कालावधीत तो जे कार्य करतो त्यावरून त्याचे पाप, पुण्य ठरले जाते. याला आयुष्य म्हणतात.
आयुष्य हे कोणालाही जगता येते. पण तो कसा जगला याला महत्त्व आहे. तो वाईट वागत आहे का तो चांगल्ययाप्रकारे वागत आहे. हे अतिशय महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाचे आयुष्य वेग- वेगळे असतात.
तो कसा वागला यावर अवलंबून असते. ..
