परमेश्वराचे स्मरण व्हावे
परमेश्वराचे स्मरण व्हावे
एकदा परदेशात महात्मा गांधीजींना तुमच्या देशात किती शंकर आहेत असा प्रश्न परदेशी नागरिकांनी विचारला होता. तेव्हा गांधीजींनी क्षणाचाही विचार न करता हमारे देश मे जितने कंकर है उतनेही शंकर है असे उत्तर दिले. म्हणजे देशातील प्रत्येक माणसामध्ये देवाचा अंश आहे असा त्याचा अर्थ होता. म्हणून भारतात अनेक धर्माचे लोक राहत असल्याने प्रत्येकाचा देव मात्र वेगवेगळा आहे.
किती देवाची पूजा केली जाते हे आज संख्येत सांगणे कठीण आहे. सगळेजण आपापल्या देवाच्या समोर विनम्रपणे प्रार्थना करीत असतात. काही नास्तिक लोकांना तर देवच अस्तित्वात नाही मग आहे तो कपट. याबद्दलची शंका मनामध्ये येते. त्यामुळे देवाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
माणूस कितीही सुखी, संपन्न असला तरीही आपले जीवन अधिक सुखी आणि आनंदमय होण्यासाठी परमेश्वराच्या चिंतनाचा, नामस्मरणाची गरज वाटतेय म्हणून आपल्याला देवासमोर जी मूर्ती देव म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवतो त्या मूर्तीची पूजा करताना कितीही श्रीमंत माणूस असला किंवा गरीब असला तरी दोघेही परमेश्वरापुढे हात जोडून आपल्या अडचणी, दु:ख, आपल्यावर येणारी संकटे दूर होऊ दे, मला आणि माझ्या कुटूंबाला सुखी ठेव.
ज्या परमेश्वराची कल्पना आपण आपल्या कल्पनेत आणतो तो परमेश्वर खरोखरच आपल्याला प्रसन्न होतो का नाही हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. जर प्रसन्न होत असेल तर माणूस हजारो वर्षे देवाची प्रार्थना तो श्रद्धेने करतो. देवाचे अस्तित्व निश्चित आहे, ते निराकार बिंदुप्रमाणे आपल्याला जाणवते. परंतु वारा जसा सहजपणे त्याचा आकार, लांबी, उंची दिसत नाही तरीही वारा असल्याची जाणीव आपल्याला जसे होते आता तसेच देवाची आठवण सुखा पेक्षा दु:खात अधिक होत राहते. दु:खाची छोटीशी झुळूक माणसाच्या अंगाला पोहचली की लगेेेे चच तो परमेश्वरााचा धावा करत असतो.
प्रत्येक माणसाला परमेश्वराच्या सानिध्यात गेल्ययानंतर तो आपली श्रीमंती, आपला थाटमाट सगळेच काही विसरून जातो. आणि सामान्य माणसा प्ररमाणे तो जीवन जगत असतो.
खरे तर अशा वेळेला जीवन जगण्याच कला परमेश्वराच्या मंदिरातून त्याला शिकायला मिळते.
म्हणून परमेश्वराचे सतत नाम अखंड. आपल्या मनात पाहिजे.
