परीवार.
परीवार.
वसुधैव कुटुंबकम संपुर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे ही व्याख्या व्यापक अशा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीला ऊददेशुन केलेली आहे यावरूनच कुटुंबाची गरज व महत्व कीती आहे याची जाणिव होते माणसानं मानसावर प्रेम करण फक्त स्वतःसाठी न जगता सर्वांसाठी जगणं निसर्ग प्राणि इत्यादीशी जिव्हाळयाच नात जोडणं हा खरा धर्म आहे. प्रत्येक माणुषय आपल्या जैविक नात्याशी कुटुंबाशी इतका घट्ट बांधला गेलेला असतो की कुटुंबाशिवाय रहाण्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही आपला राग प्रेम यश कीर्ती सुख दुःख अनुभवत असतो. छोटे मोठे प्रसंग सण उत्सव इ प्रसंग आपल्या कुटुंबासह साजरा करतो. एकुनच काय आपल्या कुटुंबांवर माणसांच इतकं प्रचंड प्रेम असत की कुटुंबासाठी मनुष्य कोणत्याही प्रकारचे कीतीही कष्टाचे काम करीत असतो. हायकलास सोसायटीत रहाणारा एखादा मनुष्य आणि त्याच सोसायटीच्या गेटवर ड्युटी करणारा वाॅचमन असो किंवा मग उच्च पदावर पाच आकडी पगार घेणारी स्त्री असो अथवा तिच्याच घरातली कामवाली बाई असो आपलया कुटुंबा प्रती असलेले विचार त्यांच्याशी सहवास संवाद तितक्याच आपुलकीने हक्काने साधतात. कुटुंबात मानसाला कधीही परकेपणाची भावना वाटत नाही उलट जगात काहीही बर वाइट करून आलो तरीही आपण आपल्या या कुटुंब नावाच्या छोट्याशा जगात येतो तेव्हा प्रेम आदर भीती तिरस्कार द्वेष राग विद्रोह अबोला अशा गोष्टींना परिस्थितीनुसार वा समज गैरसमजुतीतुन सामोरे जातो, पंरतु ते तात्पुरत्या स्वरूपात असते. कुटुंबातील व्यक्तींची नाती एकमेकांशी कीती घट्ट व विश्वासार्ह आहेत यावर जिव्हाळा प्रेम माया आपुलकी दिसुन येते बर्याचदा बोलूनच सर्व समजते अशातला भाग नसतो कृतीतूनही माणूस नात्यांची श्रेष्ठता दाखवून देतो.थोडकयात काय तर आपला परीवारच आपल्या जीवनाला आकार देतो आपल्या संघर्षाला स्वंप्नाना पुर्ण करण्यासाठी कुटुंबाचा भक्कम आधार हवा असतो माणूस दिवसरात्र मेहेनत करतो दमून थकून घरी जातो तेव्हा नजरेन मनाचा ठाव घेणारा जोडीदार असो वा लडीवाळपणे कवेत येणारी मुलं असो ज्यांच्यासाठी तो म्हणजेच जग असते त्यांना पाहुन सारा क्षीण थकवा दूर होऊन या धावणाऱ्या जगाच्या स्पर्धेत लढणयाच मोठच बळ मिळत या जगाशी आपण जिवंत असेपर्यंत एक नाळ जोडलेलीच असणार कारण आपण या दुनियेचा समाजाचा एक हिस्सा आहोत पंरतु त्या जगाच्या पलयाड आपल एक आनंदी उत्साही विश्वास प्रेम आपुलकी जिव्हाळा हे सार एकाच धागयात गुंफलेले असते आपले घरटे जे कधी मायेने तर कधी कटाक्षाने मजबुत बनवत रहायचे असते अशी आपली ही कुटुंबांतील नाती जपायलाच हवीत ना!!
