परी,
परी,
लग्नाला सात वर्षे झाली अजून मुलबाळ नाही म्हणून सासू ,सासरे तसेच नाते वाईक काही बाही बोलायचे. ते कानावर पडलं की सुनंदाचा तिळपापड व्हायचा. घरात सासू सासरे बोलले तर तिला काही वाटत नव्हते. आणि हल्ली दोघं गप्पच होते. बाळाचा विषय कुणीच काढत नव्हते. तेव्हा तिला वाटलं विवेक ने त्यांना सगळं सांगीतले असावे.
मुल होत नाही ह्याची कल्पना त्यांना आल्यावर दोघांनी तपासणी करून घेतली होती. त्यामध्ये विवेकमध्ये थोडा दोष आढळला होता. डॉ. नी त्याला भरमसाठ औषधे लिहून दिली होती. वेळ लागेल पण उपयोग जरूर होईल असे सांगीतले होते. पण आता अजून दोन वर्षे झाली. पाळणा काही हलला नाही.
सुनंदाचा विश्वास डळमळू लागला. शेवटी दोघांनी मिळून दत्तक मुल घ्यायचा विचार केला. व त्याप्रमाणे त्यांनी आपला विचार घरात बोलून सगळ्यांचे एक मत घेऊन दत्तकचा विचार पक्का केला. व लगेच सर्वांनी एकमताने एक सुंदर मुलगी दत्तक घेतली. ती जवळ जवळ सहा महिन्याची होती. गोरी सुदंर साजरी गोजरी चिमुकली 'परी' लगेच घरात सगळ्यांचा ताईत होऊन बसली.
विवेकचं ओषध पाणी चालूच होते. सुनंदा परीत एवढी रमबाण झालेली की परी स्वतःचीच मुलगी तिला वाटत होती. परीचा वाढदिवस त्यांनी थाटामाटात साजरा केला. वाढदिवसाला सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक हजर होते.सगळं व्यवस्तीत पार पडलं सुनंदा दिवसभर कामाने थकली होती. रात्रीचे सगळे आटपून ती झोपण्याची तयारी करत होती. परीचे कपडे बदलत असता ती मटकन् खाली कोसळली. विवेक जवळच होता त्यांने तिला सावरले व आईला हाक मारली. आईने पाणी वगैरे मारून तिला शुद्धीवर आणलं. सगळ्यांना वाटले दिवसभर थकव्याने चक्कर आली असेल. पण रात्री अचानक सुनंदाला आठवलं, गेले दोन महिने तिची पाळी चुकली होती. परीच्या गोंधळ गडबडीत ती पार विसरून गेलेले. विवेकशी सुध्दा ती बोलली नव्हती. आता विचार करताना ती गोष्ट तिच्या ध्यानात आली. आणि तिने झोपताना ती गोष्ट विवेकला सांगीतली.
दुसऱ्या दिवशी घरी कुणाला ही कळू न देता दोघं डॉ.कडे जाऊन आली. डॉ.नी तपासले व आनंदाची बातमी सांगीतली. दोघं आनंदाने घरी परतली येताना किलोभर पेढे ही आणले. परीची आई ती होतीच पण आता परीला भावंड मिळणार म्हणून सगळे घरातले आनंदित झाले. डॉ. चा शब्द खरा ठरला म्हणून त्यांना ही पेढे देऊन त्यांचे तोंड गोड केले. येणाऱ्या पाहण्याचे स्वागत करायला सगळी सज्ज झाली.
