प्रेमळ माणसे
प्रेमळ माणसे
एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करुन लंडन येथे जमीन खरेदी करून अलिशान घर बांधले . त्या जमीनीवर अगोदर एक सुंदर जलतरण तलाव होता. आणि मागे शंभर वर्ष जुने लिचीचे झाड होते. त्या रिचीच्या झाडीमुळे त्यांनी ती जमीन खरेदी केली. कारण त्यांच्या पत्नीला लिचीचे झाड खुप आवडते होते.
काही काळानंतर घराचे नुतनीकरण करण्याचे ठरवले. त्यांच्या काही मित्रांनी नुतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तंज्ञाचा सल्ला दिला. त्यांचा अशा गोष्टी वर विश्वास नव्हता पण मित्राचे मन राखण्यासाठी त्यांनी मान्य केले. 30 वर्षापासून प्रसिद्ध असे हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.
काओ यांना विमानतळावरून नेले व शहरात जेवण केले. आणि त्यानंतर त्यांना घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत त्यांना एखादी गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा तो त्याला रस्ता देत असे. मास्टर काओ हसले आणि म्हणाले की, तुम्ही खुप छान गाडी चालवतान. ते देखील हसले आणि प्रतिसाद दिला. आणि म्हणाले काही अडचण असेल तर लोक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात.
म्हणून त्यांना आपण मार्ग दिला. घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला. आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी झाला. तेवढ्यात एक मुलगा रस्ता पलीकडून हसत हसत आणि वेगाने पळत यांच्या गाडी समोरुन रस्ता ओलांडून गेले. त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्ता कडे पाहतच राहीला. तेव्हा त्याच रस्ता वरुन आणखी एक मुलगा चालत आलं.
त्यांच्या कारच्या समोरुन पळत बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असेल. मास्टर काओ ने आश्चर्याने विचारले की, दुसरे मुलग पळत बाहेर येईल हे तुम्हांला कसे कळले. ते मोठ्या सहजतेने म्हणाले , मुले अनेकदा एकमेकांच्या मागे मागे पळत असतात. आणि कोणतेही मुल जोडीदाराशिवाय पळत नाही.
मास्टर काओ मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही नि:संकोचपणे खुप स्थित चित व्यक्ती आहात. घराजलळ आल्यानंतर दोघेही गाडीतून उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने 7-8 पक्षी वेगाने उडताना दिसले. ते पाहून मालक मास्टर काओला म्हणाला की जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का. मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते.
त्यावर ते गृहस्थ म्हणाले की कदाचित काही मुले झाडावरून लिची तोडत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. तर झाडावरून पडून मुले जखमी होतील. तेव्हा मास्टर काओ म्हणाला की तुमच्या सारखे प्रेमळ माणसे असतील तर वास्तुशास्त्र पाहण्याची गरज नाही. वास्तु आपोआप प्रसन्न होईल.. यात शंका नाही...
