प्रेमाचे कुलूप
प्रेमाचे कुलूप


शेजारच्या कामतकाकुंकडे त्यांच्या दूरच्या नात्यातील एक देखणा, रुबाबदार तरुण नोकरीच्या निमित्ताने राहायला आला. दिलीप त्याचं नाव. पाहताक्षणीच राही त्याच्या प्रेमात पडली.आपलं हे मनातलं गोड गुपित कुणालाही कळू नये आणि दिलीपही आपल्या प्रेमात पडावा यासाठी तिने गावाबाहेरच्या तळ्याजवळील जोडझाडाला असलेल्या तारेच्या कुंपणाला एक हृदयाच्या आकाराचे कुलूप अडकवले. कुलूप ओढून पक्के लागल्याची खात्री केली आणि किल्ली तळ्याच्या पाण्यात दूर फेकून दिली. डोळे बंद करून काही तरी पुटपुटले आणि हसतच घराकडे परतली. हे जोडझाड म्हणजे दोन वेगवेगळी खोडे एकमेकांना आलिंगन देणारे प्रेमीयुगुल आहेत अशी तरुणवर्गात मान्यता होती. जे कोणी इथे येऊन कुंपणाला कुलूप लावून किल्ली फेकतील त्यांचे प्रेम नक्की यशस्वी होतेच अशी आख्यायिका होती. आज हेच काम पूर्ण करून राही समाधानी मनाने वाट चालत होती. सोबतीला होती दिलीपच्या प्रेमाची स्वप्ने.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक प्रेमकथा माझी
शीला अम्भुरे बिनगे
(साद)
परतुर ,जालना