प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे काय असते


"प्रेम म्हणजे काय असतं ?" कवी मना पासून ते लेखक मना पर्यंत, वाचक मना पासून ते तुम्हा-आम्हा सर्वां पर्यंत अशा जगातल्या सर्वांना असं हे हळूवार पडलेला प्रश्न.
प्रेमाची व्याख्या करता येत नाही ती अनुभवता येते आणि मग प्रेमाची व्याख्या कळते मग ती प्रेमाची व्याख्या स्वार्थीपणाची किंवा निस्वार्थीपणाची असेलच असे नाही हे जो या प्रेमात पडला किंवा प्रेमात पडली त्याने ठरवायचे असते.
प्रेम म्हणजे काय असतं याचं उदाहरण देताना कुणी चहाचा उदाहरण पण देऊ शकतं, कोणी म्हणेल माझे चहावर प्रेम आहे म्हणून मला चहा आवडतो. पण तुम्हा-आम्हां मधील म्हणतील “अरे चहा तुला आवडतो म्हणजे तुला त्याची तलफ घालवायचे असते म्हणून, तुला तुझ्या शरीराला स्फूर्ती मिळवायचे असते, म्हणून तर तू चहा पितो मग ह्यात रे कसलं रे तुझे चहाप्रेम? तू चहा पिऊन शरीराला स्फूर्ती मिळावी म्हणून'चहा पितो,म्हणजेच तू खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची गरज भागवतो.म्हणजेच येथे शारीरिक प्रेम आलं. हिच शारीरिक गरज 14 15 16 वर्षात वयात आलेल्या मुलांमध्ये असते.म्हणून तर आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याच असतं कारण या वयात शारीरिक सुखाची ओढ तयार होते मग विरुद्धलिंग आकर्षण निर्माण व्हायला लागतं आणि त्याच वेळी एकमेकांच्या थट्टामस्करी ने एकमेकांना शारीरिक स्पर्श होत असतो आणि हाच स्पर्श परतपरत हवाहवासा वाटतो.मग येथेच प्रेमाचे अंकुर फुलायला लागतात,आपल्या शरीर मनाने तनाने परिपक्व व्हायला येतं. मुलांना वयात येण्याआधी नातीगोती काय असतात त्याबरोबर आपलं त्यांच्याबरोबर संबंध काय असतात आणि आपली मर्यादा त्यांच्याबरोबर काय असायला पाहिजे याचं ज्ञान पालकांनी आणि कुटुंबवत्सल व्यक्तीने द्यायला हवं नाहीतर या वयात आल्यानंतर नातीगोती माहिती नसल्यामुळे मुलं-मुली एकामेकांच्या प्रेमात पडतात आणि मग एकच गोतावळा तयार होतो. समाजात अशा जोड्यांना मान नसतो. आणि नैसर्गिक दृष्ट्या ते बरोबर ही नसतं कारण एकाच रक्ताच्या नात्यात प्रेमाने जुळल्याने त्यांच्यातून होणार्या मुलांवर वेगळाच शारीरिक दोष निर्माण होत असतं म्हणून तर आपल्या पूर्वजांनी काही अशा शास्त्रातील गोष्टीमधून अशा नात्यातील प्रेमाला बंधने घातली होती म्हणून तर आपण पण अशावेळी पालकांनी जागरूक राहून वयात आलेल्या मुलांमुलींकडे लक्ष द्यायला हवा.
आपण आताच्या पिढीत पाहतो मुलांना पालकांकडून नातंचं ,रिलेशनचं म्हणजे नक्की काय हे समजायला धावपळीमुळे वेळच मिळत नाही,पण काही जागरूक पालक वेळातवेळ काढून आपल्या पाल्यासाठी वेळ देतात हिच मोठी कौतुकस्पद गोष्ट. पण काही ठिकाणी जागरुकता न आल्याने व शिकवण मिळत नसल्याने ती मुले वयात आल्याने कोण मावसबहीण? कोण मावसभाऊ ? कोण काकेबहीण,?कोण काकेभाऊ? कोण चुलतभाऊ? कोण चुलतबहीण ?,मामा भाची काका पुतणी यांची पवित्र नाती बघत नाहीत आणि लफड करून बसतात. आणि वेळप्रसंगी लग्नही करतात त्यामुळे होतं काय? बायकोच्या पावित्र्याबद्दल,नवर्याच्या पावित्र्याबद्दल कुणी,कसा विश्वास ठेवील?
येणारी पिढी स्वैराचारात गुरफटून दिशाहीन झाल्यासारखे होईल. अशीच काही वर्षांपूर्वी घडलेली एक गोष्ट धर्मापालची शेतजमिनीचे पैसे मिळाले होते. याआधी तो टर्नर असल्याने नोकरी करायचा पण अचानक शेतजमिनीचे त्याला पैसे मिळाल्याने.तो पैशाने मालामाल झाला होता. त्याच्या भावंडांनाही पैसाअडका मिळाला होता.त्यामुळे ते सुद्धा पैशाने मालामाल झाले होते आणि त्याबरोबर आपण या जगात आपणच शहाणा असा स्वभावही आला होता. अहंकार वाढला होता. आणि मग एक दुसऱ्याबद्दल मी किती श्रीमंत ,त्याच्यापेक्षा माझ्याकडे हाय कॉलिटी चा मोबाईल, टॅब,गाडी बंगला आहे,नुसत्या माझ्या घरातल्या फर्निचर साठी करोडो रुपये खर्च केले,दुसर्याने काय केले? त्याच्याकडे काय आहे?हि चढाआओढीचा फरक इतरांबरोबर करीत होता.माझ्या मुलांना मी किमती वस्तु पुरवतं आहे माझे मुलेही ह्या वस्तू वापरतात, अरे पण अशाने मुलांवर लाड केल्याने , ती मुलं त्यांना कसलीच किंमत देणार नाही, त्यांना कामाची जाण येणार नाही ते अकार्यक्षम राहतील हे कधी विचार केलास का ,तुम्ही काय जेवण करता ,जेवण करावं तर आमच्या सारख्याने तुमच्या जेवणात काय फक्त तांदूळ असतात. आम्ही जेवताना बासमती तांदळाचा वापर करतो तुम्ही काय करता? धर्मपाल बहिणीच्या मुलांना असा काही शब्द बोलत होता त्यामुळे मामाला अहंकार आलेला आहे पण हाच मामा त्या भाचांकडे वीस-पंचवीस वर्षे राहिला त्यावेळी त्याच्या भाच्याच्या आईने आपला भावाला धर्मपालला किंवा वडिलांनी आपला मेहुणा धर्मपाल आपलाकडे राहतो ,खाणेपिणे करतो म्हणुन कधीही कशाही बाबतीत हिनवलं नाही,कशाची अपेक्षा पण केली नाही धर्मपालच्या बहिणीच्या नवर्याने आपल्या बायकोचा भाऊ म्हणून आणखीनच जातीनं लक्ष दिलं होतं. मेहूना म्हणून कधी कोणत्या बाबतीत हिणवलं नाही, एक पाहुण्यासारखा त्याला जेवूखाऊ घातलं ,घरी राहू दिलं होतं,पण जसे शेतजमिनीचे पैसे मिळाल्याबरोबर पण आता या सगळ्या गोष्टी विसरून अहंकारी झाला होता. आता पुढची गंमत पाहा त्याच्या मुलांची लग्न करायला घेतलं. मुलीने आधीच आंतरजातीय प्रेमविवाह केला. पण दुसऱ्या मुलीसाठी ही धर्मपालने आपल्याच जातीमध्ये लग्नासाठी शोधाशोध केली आणि लग्न जुळवलं पण या धर्मपालच्या दुसऱ्या मुलीचं एक दुसरं लफडं होतं तिने ते लपवून ठेवलं होतं इथे धर्मपालने जे काही लग्न जमवलं होतं ते लग्न मोठ्या धुमधडाक्यात करायचं ठरवलं होतं. त्याने फार मोठ्या किंमतीच्या लग्नपत्रिका ही छापल्या होत्या .पण ज्यां आई बाबाच्या शेतजमिनी विकुन जो पैसाअडका मिळाला होता , त्यामुळे त्या पैशाने मुलांची लग्न करायला घेतली होती आणि यावर या महागड्या लग्नपत्रिकेत त्याने आपलं स्वर्गीय आईवडिलांची साधं नावही टाकले नाहीत, ते तर जाऊ दे मोठ्या बहिणीच्या नवर्याकडे ,बहिणी कडे वीस पंचवीस वर्ष राहायला होता खायला प्यायला होता पण त्यांचेसुद्धा लग्नपत्रिकेत या अहंकार माणसाने नावे
टाकली नाहीत. त्याची मोठी बहीण आणि मेव्हणे जिवंत असते तर त्यांना फार मोठं दुःख झालं असतं कारण याच धर्मपालचं बहिणीने आणि मेहुण्यांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळी पत्रिकेत या सगळ्या मेव्हण्यांचे नाव टाकली होती. माणूस पैसा आल्यावर कसा फिरतो हे याचं उदाहरण होतं पण आपण कितीही नियतीच्या विरुद्ध वागलो ना पण नियती आपल्याला सोडत नाही हेच खरं, झाली काय गंमत धर्मपालने या दुसऱ्या मुलीचं लग्न करायला घेतलं होतं ती मुलगी नवऱ्याच्या घरी नांदली नाही आणि परत घरी आली आणि लग्न मोडलं होतं सारा खर्च धर्मपालला द्यावा लागला आता लग्नाची पोर म्हणून ठेवता येत नाही म्हणून धर्मपालने या दुसऱ्या मुलीसाठी मुलगा शोधायचा प्रयत्न केला आणि जमलंही आताच लग्न होणार होतं पण या लग्नात तिच्या चुलतकाकाचा मुलगा हळदीमध्ये खूप नाचला त्या मुला मुलांमध्ये थट्टामस्करी पण झाली आणि त्यातच धर्मपालच्या दुसऱ्या मुलीने काकाच्या मुलाबरोबर प्रेमचाळे करून बसली.धर्मपालची हि दुसरी मुलगी चुलतकाकाच्या मुलाबरोबर पळून गेली.आणि इथेच हळदीलग्नाचा झालेला खर्च धर्मपालला करावा लागला,
इथेच हे प्रेम असा आंधळ असतं का? असा प्रश्न पडतो म्हणजेच भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातलं जे काय संबंध असतं इथे सगळ्यांसमोर दूषित झाल्यासारखं वाटत.ईथेच चुलत बहिणीने चुलत भावाबरोबर प्रेमाच्या नावानं लफडं केला होता म्हणजेच इथे प्रेम किती वाईट परिणाम देऊ शकतो पण ज्यांनी हे असं अनेतिक संबंध केलेत प्रेमाच्या नावानं त्यांना त्याचं काहीच वाटत नाही पण समाजाला अशा गोष्टीची घृणा वाटणारच.
आता समजा आपण एक गोष्ट विचारात घेतली तर अशी कल्पना केली आपल्याला आपल्या मुलासाठी मुलगी बघायची आहे आणि आपण मुलगी बघितली सुद्धाआणिलग्न जमवलं सुद्धा पण तिचा भाऊ ,तिचा चुलत भाऊ तिचा मावस भाऊ याबद्दल का कोणी संशय घेणार नाही ?आणि म्हणतील काही ठिकानी अशा काही घटना घडल्यात म्हणून आम्हांला चौकशी करणे जरुरीचे आहे मग भाऊ-बहिणीचा पवित्र संबंधाला काय अर्थ उरणार आहे,
भाऊ-बहिणीचा पवित्र संबंध असतानादेखील त्या मुलीचे दुसर्यांच्या अशा चुकीमुळे लग्न मोडला जाईल म्हणून अशा आंधळ्या प्रेमाला वेळीच आवर घालायला हवा म्हणजेच प्रेम काय असतं हे प्रत्येकाला समजायला हवं