STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

प्रारब्ध

प्रारब्ध

2 mins
9

*प्रारब्ध*
 प्रारब्ध म्हणजे काय तर नशीब. माझ्या नशिबात राजयोग आहे म्हणून तुम्ही जर का निवांत बसलात, काहीच काम केली नाही तर तो तुम्हाला राजयोग कसा मिळेल? राज योगाचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा आपल्याला कर्म केलेच पाहिजे कष्ट केलेच पाहिजेत कार्यातून आपण सिद्ध झालेच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे.... या उक्ती प्रमाणे माणसाने प्रयत्न केला, हालचाल केली तर आपल्या हातात यश प्राप्त होते नाही तर प्रयत्नच केला नाही तर यशप्राप्तीपर्यंत, ध्येयापर्यंत,उद्दिष्टांपर्यंत माणूस पोहोचू शकत नाही. प्रारब्ध म्हणजे नशीब नशिबावर सर्व अवलंबूनआहे असे म्हणून माणूस हातावर हात ठेवून बसला तर काहीच साध्य होणार नाही.हाताच्या रेषा काय म्हणतात हे तुम्ही सतत भविष्यातून ऐकत गेल्यात वाचत गेलात किंवा तुम्ही इतरांना हात दाखवत गेलात तर "हात दाखवून अवलक्षण" पण असं म्हण आहे. बऱ्याचदा याचा आपल्याला अनुभव सुद्धा येतो. जानकर भविष्याला आपला हात दाखवला आणि हात दाखवून त्या हातातल्या रेषांमधून आपल्याला काही ऐकायला मिळालं तर आपण नाराज होतो. पुढील कार्य करण्यासाठी धजवत नाही. आपल्याला भीती वाटते म्हणून ही म्हण आहे "हात दाखवून अवलक्षण".... त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये सगळं आहे हाताच्या रेषांमध्ये काही नाहीये "आपला हात जगन्नाथ "असा पण म्हणतो. याचे कारण असे की आपण आपल्याच हातांच्या बळावर कष्ट करून, आपण जर काही यश मिळवले, प्राप्त केले, तर निश्चितच आपल्या हाताच्या रेषांवर आपण मात करतो. हाताच्या रेषा कितीही कठीण असतील तरीसुद्धा हाताची पाची बोटे मिळून, दोन्ही हात मिळून जी ताकद तयार होते तिथे आपले कार्य दिसून येते. आपण कार्याची प्रेरणा बनायला हवे. इतरांना दाखवून द्यायला हवे. एक गाणे आहे माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा... कधी कधी बोटं माझी तबला वाजवतात.. कधीकधी बोटं माझी मासे ही म्हणतात... नेहमीच माझी बोटे कामही करतात... असा आपण आपल्या बोटांबद्दल गाणे छान बनवू शकतो. नशिबात असणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या होतात असे नव्हे तर नशीब घडवण्याची ताकद आपल्या बोटांमध्ये आहे एवढेच मला सांगायचे आहे. वसुधा नाईक, पुणे 🙏🌹🙏


Rate this content
Log in