Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा

1 min
213


एका गावात एक श्रीमंत व्यक्तीने एका मंदिर बांधले . मंदिरातील देवाची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला. मंदिराचा खर्च भागाला म्हणून मंदिराच्या नावे खूप सारी जमीन, शेती व बाग केली. मंदिरात जे भुकेले, दीन-दुखी, साधू संत येतील ते तेथे दोन-चार दिवस राहतील त्यांच्या भोजनासाठी भगवंताचा प्रसाद मंदिरातून मिळेल. अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आता त्यांना अशा माणसांची गरज होती जो मंदिराच्या निधीची व्यवस्था आणि मंदिरातील सर्व कामकाज व्यवस्थीत चालवेल. त्या व्यक्तीने फर्मान काढले होते. त्यामुळे खूप इच्छूक लोक आले होते. कि त्या मंदिरातील व्यवस्थेचे कामकाज मिळेल आणि आपल्याला पगार चांगला मिळेल.

     हे ते विचार करित होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने त्या सर्वांना परत पाठवले. तो सर्वांना म्हणाला, "मला एक भला माणूस पाहीजे, आणि मी स्वतः त्याची निवड करेन ". उपस्थित सर्व लोकांनी त्या श्रीमंत माणसाला मनातल्या मनात खूप शिव्या दिल्या. खूप लोक त्याला वेडयात काढले. परंतु त्या व्यक्तीने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही.          

जेव्हा मंदिराचे दार उघडले असे लोक देवाच्या दर्शनासाठी येऊ तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या लोकांचे शांतपणे निरिक्षण करत होता. त्याला एक असा माणूस दिसला की तो देव दर्शनासाठी शांतपणे येऊन मंदिरातील केर कचरा गोळा करित होता.

     मंदिर स्वच्छ करत होता. तेव्हा या व्यक्तीला मंदिराच्या व्यवस्थेसाठी ठेवले पाहिजे. म्हणून त्या व्यक्तीची निवड केली..आणि तो प्रामाणिक व्यक्ती होता...... 


Rate this content
Log in