Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

प्रामाणिक

प्रामाणिक

4 mins
637


एक लहानसा गाव होता. त्या गावात एक म्हातारी आजी तिच्या नातवा बरोबर राहत होती. त्यांना आणखी कुणाचा आधार नव्हता.


आजी रोज सकाळी टोपली घेऊन गावात फिरून शेण गोळा करायची व त्याच्या गोवऱ्या करून विकायची. तिचा नातू गुणवंत दुसरीत शिकत होता. तो लांबच्या शाळेत जात होता. गुणवंत अभ्यास करून आजीलाही थोडीफार मदत करत होता.


एकदा काय झाले आजीला सणसणून ताप आला. तिच अंग डोकं खूप दुखायला लागलं. एक दोन दिवस ताप तसाच राहिला. आजी अशक्त झाली. तिला काही करता येईना. शेण गोळा केलेले तसेच पडून राहिले होते. आजी झोपली होती तेव्हा गुणवंतने ते शेण कालवले व आजी थापत होती तशा गोवऱ्या थापल्या व नंतर हात धुऊन चुलीवर पेज ठेवली. आजीला जाग आली. तिने विचारले "गण्या, शाळेला नाही गेला बाळा". "नाही ग आजी. शेण कुजत होतं त्याच्या गोवऱ्या केल्या, तू करते ना तशाच. तुला बरं वाटलं की बघ हं". "अरे रामा, तू शेण कालवलंस?" आजी चकीत झाली. आजीचा ताप आता थोडा उतरला होता पण तिला अश्यक्तपणा खूप आला होता. आजीची काळजी घ्यावी व तिला मदत करावी म्हणून गुणवंत चार दिवस शाळेत गेला नाही. सकाळी टोपली घेऊन तो शेण गोळा करायला जात असे. एके दिवशी काय झाले गुणवंत शेण गोळा करत होता तेवढ्यात एक सुटाबुटातला माणून आपलं पैशाच्या पाकिटात बघत बघत आला व त्याच्या गाडीचा दरवाजा उघडता उघडता त्याने ते पाकीट पेंटच्या मागच्या खिशात घालताना ते रस्यावर पडले. ते गुणवंतने पाहिले. त्याने "साहेब साहेब " हाका मारल्या, पण ते साहेब गाडी घेऊन भरधाव गेले. गुणवंतने ते पाकीट उचलले. आता काय करावे तो विचारात पडला. त्या माणसाला त्याचे पाकीट द्यायला हवे. लगेच त्याच्या मनात विचार आला. आपण हे पाकीट पोलिस चौकीत द्यावे. मग ते त्यांना देतील. शेण गोळा करायचे सोडून तो जवळ असलेल्या पोलिस चौकीत गेला. पोलिसाने सगळे विचारून घेतले. पाकीट उघडून बघितले, आत खूप पैसे होते. कुणालाही हाव सुटावी असे. मी देतो हं त्या माणसाला, तू जा आता घरी, असे पोलिसाने त्याला सांगितले. गुणवंताला गाडीचा नंबर माहीत होता. तो म्हणाला," पोलिस काका, त्या साहेबांच्या गाडीचा नंबर लिहून घ्या". "असं होय, सांग बरं नबंर". पोलिस नंबर लिहीत होता एवढ्यात ते साहेबच पोलिच चौकित आपले पाकीट हरवल्याची तक्रार द्यायला आले.


गुणवंतने त्या साहेबाना लगेच ओळखले व तो म्हणाला, साहेब तुमचं पाकीट मी पोलिस काकांना आताच दिलयं. पोलिस काका द्या ते पाकीट साहेबाना. मी जातो. माझी शेणाची टोपली मी रस्यावरच ठेवलीय. मला शाळेतही जायचय आज." असे सांगून तो जाऊ लागला. तेव्हा त्या साहेबानी त्याला थांबवलं व पाकीटातून शंभर रुपया़ची नोट त्याला देऊ लागले. पण गुणवंतने ते घेतले नाही. "अरे तुझ्यामुळे मला माझे पाकीट मिळाले, घे तुला बक्षीस". "नको नको. आजीला आवडणार नाही व शाळेतले शिक्षक ही सांगतात उगीच कुणाचे काही घ्यायचे नाही." "असं होय, बरं बाबा. कुठल्या शाळेत जातो तू? गुणवंतने शाळेचे नाव पत्ता नीट सांगितला व तो निघाला.

आपली टोपली घेऊन तो शेण गोळा करायला निघाला पण, आज उशीर झाल्याने त्याला ते खूपच कमी मिळाले. घरी गेल्यावर पाकिटाची गोष्ट त्याने आजीला सांगितली. आजीनेही त्याला शाबासकी दिली. आजीला मदत करून तो आपला शाळेचा अभ्यास करायला बसला.


अभ्यास झाल्यावर तो आत गेला तर आजी अंथरुणात कण्हत होती. त्याने आजीच्या कपाळाला हात लावून बघितला तर तिला खूपच ताप परत आला होता. त्याने आजीला उठवून औषध दिले. "आजी तुला पुन्हा ताप कसा आला? झोपून रहा सांगितले होते तू एकले नाही माझे.आता तू स्वस्थ रहा. मी सगळी कामे करीन व तुला बरं वाटल्यावरच शाळेत जाईन. लवकर बरी हो.


   दुसरा दिवस उजाडला. आजीचा ताप काही कमी झाला नाही उलट जास्तच वाढला. गुणवंतला आजीची खूप काळजी वाटली. तो देवाच्या फोटोसमोर उभा राहून देवाला आळवू लागला. "देवा माझ्या आजीला लवकर बरं कर. आता माझी परिक्षा असेल. आजी आजारीच राहिली तर मी शाळेत कसा जाईन. माझी परीक्षा चुकेल. देवबाप्पा आजीला लवकर बरी कर.' असे म्हणून तो देवाच्या फोटोसमोर डोळे बंद करून प्रार्थना करू लागला. एवढ्यात "गुणवंता बाळ आहे का घरात." असा त्याच्या गुरुजीचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने मान वळवून दरवाज्याकडे पाहिले . तर त्याचे गुरुजी व ते साहेब दरवाज्यात उभे होते.


ते साहेब एक मोठे नावाजले डॉक्टर होते. गुणवंतचा प्रामणिकपणा त्यांना खूप आवडला. त्याचा प्रामाणिकपणा शाळेला कळावा व त्याचे कौतुक करावे म्हणून ते शाळेत गेले. पण तेथे त्यांना गुणवंतची परिस्थीती व हालाखी समजली. आजारी आजीमुळे शाळेत येत नाही हे ही कळले. म्हणून त्याच्या आजीला भेटायला ते व गुरुजी त्याच्या घरी आले होते.

गुणवंतच्या आजीला त्यांनी तपासले. स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार केले व गुणवंतच्या शिक्षणाची सारी जबाबदारी घेतोय असे त्यांनी आजी व गुरुजीना सांगितले. उपचार मिळाल्यावर आजी ठीक झाली. डॉक्टर नी त्यांना आर्थिक मदत केली. गुणवंत ही खूप शिकून मोठा साहेबा सारखा डॉक्टर झाला.


मुलांनो बघितले प्रामाणिकपणाचे किती चांगले फळ मिळाले ते. आजी शिवाय कुणाचा आधार नसलेला, शेण गोळा करणारा गुणवंत प्रामाणिकपणामुळे एक मोठा डॉक्टर झाला. तो ही एक आर्दश डॉक्टर होईल ह्यात शंकाच नाही.Rate this content
Log in