Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

पक्षिकी

पक्षिकी

1 min
436


झाडांची कत्तल करताना तेही झाड तोडल्या गेले. ज्यावर पोपटाची ढोली होती. घुबड पोपटाला म्हणाले - "मित्रा! नको काळजी करू. आपण दोघे माझ्या ढोलीत राहू.

" पण हे कसे शक्य आहे. "

" का शक्य नाही. मी रोज दिवसा झोपतो आणि रात्री जागतो. तू सकाळी उठतो आणि रात्री झोपतो. प्रश्नच सुटला. आता पावसाळा सुरू होईल. बिया रुजवू. पुन्हा जंगल उभे राहील . 

अरे! माणसाने माणुसकी सोडली असली तरी आपली पक्षिकी आजही टिकून आहे मित्रा" यावर दोघेही दिलखुलासपणे हसले. 


Rate this content
Log in