पिवळी पाने...
पिवळी पाने...
1 min
488
सकाळी सकाळी दोन झाडांमध्ये चर्चा चालू होती. एक झाड म्हणाले -
"काय रे ही माणसं क्षुल्लक कारणावरून वाद घालतात. पडली तुझी दोन पानं आमच्या अंगणात तर काय बिघडले. फुले फळे हवीत. फक्त गळालेली पिवळी पाने नकोत यांना."
दुसरे म्हणाले - "जाऊ दे रे मित्रा. आपण कुठे रागवतो. आपल्याला चालता आले असते तर अंग बाहेरच झटकून आलो असतो. "एवढ्यात वारा देखील त्यांच्यात सामिल झाला. तिघेही खो खो करून हसू लागली आणि पिवळी पाने गळून अंगणात पडली.
