पहिल्या पावसाचा थेंब
पहिल्या पावसाचा थेंब
पहिल्या पावसाचा थेंब.... तुझी पहिली भेट मी माझ्या आठवणिच्या गाभार्यात जपुन ठेवली आहे. तो पहिल्या पावसाचा थेंब, तुझ्या गाळावरुन ठिपकत ठिपकत ओठांवर फिदा झाला होता. तोच थेंब जो तुझ्या केसाच्या अंबारीतुन खाली झिरपत झिरपत तुझे सौंदर्य फुलवत होता. तोच थेंब जो धरतीचा मातीत मिसळुन तुझ्या श्वासावर फिदा झाला होता. तोच सुगंध मी माझ्या पहिली भेट म्हनुन जपुन आठवणीच्या कुप्पीत ठेवलाय.... रोज जेव्हा तुझी आठवन येते, तेव्हा तोच पहिला पाण्याचा थेंब नसतो अनुभवयाला; म्हनुन मी तुझ्या प्रत्येक आठवणिचे प्रतिक, आपल्या पहिल्या प्रेमाचे प्रतिक, त्या मातीच्या पहिला सुगंध:हा कुठे रोज अनुभवता योतो...म्हनुन..जेव्हा ती कुप्पी उघडतो तेव्हा खमंग भज्जीचा, त्या मात
ीचा, तुला केलेल्या स्पर्शाचा ,त्या चौपाटीवर बसुन पहिल्या पाऊसाची घेतलेला आनंद ..त्या आपण खाल्येल्या मक्याच्या कंसाचा.मी जपुन ठेनला आहे...तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी....फ्रेश..जेव्हा मी जातो..फ्लशबँक मध्ये...तेव्हा तोच अनुभव ...फ्रिजमध्ये ठेवलेल्या हिरव्यागार पाल्याभाजाप्रमाने,तोच हिरव्यागवताचा शालु पांगरलेली धरणी, मी त्या आठवणीचा कुप्पीत दडवुन ठेवलेय...कारण ...ह्या उंच भरारी घेण्यार्या गगन चुंबी ईमारतीमध्ये, कांँक्रीटच्या रस्त्याखाली दडपुन गेला आहे...त्या हिरव्या नंदनवनाचा आनंद..आता फक्त उरल्या आठवणी....जर का मला पहिल्या पाउसाचा मातीची सुगंध घ्यायचा तर ..मी दिलखुलास ती कुप्पी उघडतो....आणी तोच आस्वाद घेतो...गतकाळातील आठवणीचा.....