STORYMIRROR

सई कुलकर्णी

Others

3  

सई कुलकर्णी

Others

पहिला आनंदोत्सव (सत्य की भ्रम)

पहिला आनंदोत्सव (सत्य की भ्रम)

1 min
259

तिने पापण्यांची थोडी हालचाल केली.. हाताची बोटंही थोडी थरथरली.. आणि विक्रांतच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला.. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.. 


विक्रांत आज हॉस्पिटलामध्ये आजीला सांगायला गेला होता की त्याने राजश्रीला मागणी घातली आहे.. आणि राजश्रीच्या घरच्यांनीही होकार कळवला आहे.. लहानपणापासून प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तो आजीलाच सांगायचा.. कारण विक्रांतच्या जन्मतःच त्याचे आई-वडील अपघातात देवाघरी गेले होते.. 


आजी म्हणजे त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता.. आजीनेच त्याला लहानाचं मोठं केलं होतं.. शिक्षण आणि संस्कार यांच्यासोबतच व्यवहार आणि वाक्चातुर्यही तिने त्याला शिकवलं होतं.. उच्चविद्याविभूषित विक्रांत उत्तम माणूसही होता.. एक आदर्श मुलगाच होता.. 


पण दहा वर्षांपासून त्याची आजी क्षुल्लक कारणावरून कोमात गेली आणि विक्रांत एकदम शांतच झाला.. आता आयुष्यात स्थिरस्थावर होऊन त्याने त्याच्या बालमैत्रिणीला म्हणजेच राजश्रीला जीवनसंगिनी म्हणून निवडलं होतं.. आणि राजश्रीचं कुटुंब बोलणी करायला पुढच्याच आठवड्यात येणार होतं.. आज त्याची ही बातमी ऐकून आजीने ती समजल्याचे संकेत दिले.. आणि पहिल्यांदाच विक्रांतला आनंदोत्सव साजरा करावासा वाटला.. 


Rate this content
Log in