फेसबुक
फेसबुक
फेसबुक म्हणजे काय हो?
फेसबुक म्हणजे आपल्या स्वतःचा चेहरा जगाला दाखवणं.आपली ओळख जगायला करून देणं. आपले विविध उपक्रम जे चालतात ते सर्वांना माहीत होणं.
या फेसबुक वर अनेक ओळखी होतात. प्रथम आपले अकाउंट उघडतो. आपली माहिती अपडेट करतो. आपल्या माहितीवरून आणि फोटो वरून लोक आपल्याला मित्राची रिक्वेस्ट पाठवतात. आपण ती रिक्वेस्ट घ्यायची की नाही हे आपण ठरवायचं असतं. कारण इथे आपले नातेवाईक,मित्रपरिवार आणि मित्रांचे मित्रपरिवार असे खूप जण असतात. आपल्या व्हाट्सअप मधले लोक असतात. आपल्या जुन्या ओळखतील लोक, मित्र परिवार असतो. फेसबुक वर आपल्याला अनेक ओळखीचे लोक भेटतात. काही लोक आपल्या विस्मृतीतही गेलेली असतात. अशी सर्व लोक एकत्र येऊन आपण आपल्या उपक्रमांची विचारांची देवाण-घेवाण करतो.
फेसबुक छानच आहे. पण ते योग्य रीतीने हाताळले पाहिजे. कारण इथे सर्वजण चांगले असतात असं नाही.
माझे तर म्हणणे असे आहे की,आपण चांगला आहे तर समोरचा देखील चांगला असतो. फक्त आपल्याला ओळख नीट व्हायला हवी. नाही तर अचानक संकटांचा भडीमार व्हायला सुरुवात होते.
उदा :- ओळख काढून फसवणे. आपले फेसबुक अकाउंट हॅक करणे. अशा परिस्थितीत माणूस संकटांना सामोरा जातो. त्याला मनस्ताप होतो.
आपले अकाउंट हॅक केल्यानंतर पैशांची मागणी होते. काही वेळेला आपलेच अकाउंट- फेक अकाउंट काढले जाते. आपल्याला सर्व लोक ओळखत असतात. या लोकांना घरचे लहान मुल आजारी आहे.पती आजारी आहे.मुलं आजारी आहेत. मला पैशांची गरज आहे, असे सांगून पैशांची मागणी केली जाते.
माझ्याही बाबतीत असे घडले होते. 2021 मध्ये अचानक दुपारी मला एक फोन आला," बाई तुम्हाला खरच पैशांची गरज आहे का? "मी माझ्या स्टुडन्टला विचारले "का रे बाळा?"तो म्हणाला "बाई,फेसबुक वरती तुमच्या नावानं पैशांची मागणी होत आहे." मला ते खरे वाटेना
म्हणून मी तुम्हाला कॉल केला". मी पटकन फेसबुक पहिले. एक अकाउंट उघडून तो माणूस माझ्या 20 मित्रांना त्यांना पैशांची मागणी केली होती. कोणाला एक हजार मागितले,कोणाला दोन हजार मागितले कोणाला पाच हजार मागितले.
मला चार-पाच जणांचे फोन आले. आई खरंच गरज आहे का तुम्हाला पैशांची?
मी तर अगदी रडकुंडीला आले होते. काय करावं समजत नव्हतं. पतिच्या कानावर ही गोष्ट घातली.
माझा एक स्टुडन्ट पोलीस आहे संदिपला फोन केला. तो म्हणाला "बाई माझे अकाउंट हॅक झाले होते तुम्ही काळजी करू नका. पटकन सगळीकडे मेसेज टाकून द्या तुमच्या स्टेटसला, फेसबुक स्टेटसला, फेसबुकला. जर माझ्या नावाने पैशांची मागणी कोणी केली तर,तुम्ही ते पैसे देऊ नका.मला पैशांची गरज नाही माझे अकाउंट हॅक केले आहे."
ताबडतोब सगळीकडे हे मेसेज टाकून दिल्यानंतर काही वेळातच सर्वांना मेसेज जायचे बंद झाले.
तरी देखील काही लोकांनी मला चार ते पाच हजार रुपये दिले गेले होते. अर्थात ते माझ्यापर्यंत आले नाहीत हॅकर पर्यंत गेले होते. माझ्या जोशी नावाच्या स्टुडन्टने क्राईमला पण ही न्यूज दिली. मला बोलला "बाई तुम्ही कोणतीही काळजी करू नका. तुम्ही कुठे पिक्चर मध्ये येणार नाही असा आम्ही मागवा काढतो."
क्राइम च्या लोकांनी तर काय ॲक्शन घेतली नाहीच. माझ्या मुलाने मात्र त्या मुलाला शोधून काढले.त्याला खूप बोलला. मला तो कोण आहे, कसा आहे हे सांगितले. माझा फेसबुकचा फोटो बदलायला लावला. लॉक करायला सांगितले. आणि मग जरा हुश्श झाले.
हल्ली सर्रास या घटना होत आहेत. तर सर्वांनी आपले फेसबुक अकाउंट लॉक करावे.
जास्त आहारी जावू नये. ज्या गोष्टी मला कायम रहाव्यात असे वाटते त्या मी फेसबुक वर ठेवते. उदा :- पुरस्कार, शालेय माहिती, खास आकर्षक माहिती, फोटो इत्यादी शेअर करते.
असो शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो कसा हाताळायचा हे सर्वजण जाणतात. इतकेच बोलेन सर्वांनी सतर्क राहावे.
प्रत्येक नवीन तंत्रज्ञानातून खूप काही शिकण्या सारखे आहे. चांगले ते घ्यावे. वाईट सोडूनी दयावे....
