फौजी स्वप्नातला
फौजी स्वप्नातला


अनामिका लहानपणापासून शाळेत होणाऱ्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एखाद्या झेंडा फडकताना बघून ऊर अगदी अभिमानाने भरून यायचा. त्या दिवशी असणारी सर्व मुलांची शिस्त, काटेकोरपणा, मनाला स्पर्श करून जायचं. एवढे काही समजत नव्हते पण देशभक्तीची गाणी लागली की खूप छान वाटायचं. त्याच वेळेला तिरंगा आणि क्रांती हे चित्रपट पाहिले. बॉर्डर, सरफरोश यासारख्या चित्रपट पाहून फौजीबद्दल तिच्या मनात आदर आणखी वाढत गेला. प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या परेडचे लाइव्ह दूरदर्शनवर दाखवली जायचं. ती तिने कधीच miss नाही केली. फौजी आपल्या घर कुटुंब पासून दूर राहतात... फक्त आणि फक्त आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी.
फौजी नुसते नाव जरी ऐकलं तरीही गर्व वाटावा असे त्यांचे कर्तृत्व खरचं वाखाणण्याजोगं आहे. ऊन, थंडी, वारा कशाची तमा न बाळगता ते दिवस रात्री देशसेवेसाठी तत्पर असतात. ते आहेत म्हणून आपण निवांत झोपी जातो. अनामिका चे चूलत आजोबा फौजी होते. त्यांच्याकडून खूप काही ऐकायला मिळत होते. तिला वाटायचं आपल्यालाही फौजी नवरा मिळावा. अभिमानाने त्यांच्या सोबत मिरवायला मिळावं . फौजीची बायको नुसते ऐकूनसुध्दा गर्व वाटायचं सतत स्वप्न बघायची अनामिका .
म्हणतात ना...
किसी चीज की तमन्ना दिलसे करो
तो सारी कायनात उसे पुरा करने मे जुट जाती है।
असच काहीसं झालं,उशिरा का होईना पण तिच्या बाबतीत असं घडले.फौजी मुलांचं स्थळ चालून आलं आणि एका फौजी सोबत लग्न करायचे स्वप्न साकार झाले.