Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

पदर

पदर

1 min
69


पदर हा काय जादुई शब्द आहे काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही उकार नाही, अनुस्वार नाही. एक सरळ  तीन अक्षरी शब्द पण केवढा विश्व सामावलेलं आहे त्यात किती अर्थ, किती महत्त्व, काय आहे हा पदर......? साडी नसणाऱ्या स्त्री च्या खांद्यावर रुळणारा मीटर दिड मीटर लांबीचा भाग.

      तो स्त्री च्या रक्षणाचा, प्रतिष्ठेचा भाग आहे. आनखीन काही बरिच कर्तव्य पार पाडत असतो. या प्राचार्य उपयोग स्त्री कधी, केव्हा आणि कसा आणि कशासाठी करते हे सांगता येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदर असलेली साडी वापरतात. सगळया जणीची चर्चा तीच असते.

     लहान मुलांची आणि आईचा पदर हे नातं अजब आहे. मुलं लहान असताना (तान्ह) आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करते. जरा मोठं झाले की वरण-भात खाऊ लागले की त्याचे तोंड पुसण्यासाठी आई तिच्या प्राचार्य उपयोग करते.

     मुल शाळेत जाऊ लागले तर त्याला आणायला आई जाते तेव्हा मुल तिच्या प्राचार्य आधार घेते. एवढच काय जेवण झाल्यावर हात धुतल्यावर टाकवे ऐवजी आईच्या पदराचाच उपयोग करतो. आईला पण या गोष्टी हव्याहव्याशा वाटू लागतात. लग्न झाल्यावर नवरा-नवरी ची गाठ बांधली जाते. तेव्हा नववच्या पदराचाच उपयोग करतात. 


Rate this content
Log in