Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meenakshi Kilawat

Others


4.0  

Meenakshi Kilawat

Others


पाश्चात्त्य संस्कृती शाप की

पाश्चात्त्य संस्कृती शाप की

5 mins 1.2K 5 mins 1.2K

  पाश्चात्त्य संस्कृती अत्याधुनिक व ऐश्वर्य संपन्न आहे. त्यांची उच्चकांक्षा स्वत:पुरतीच मर्यादित आहे. त्यांचा तामझाम झगममगाट पाहून इतर देशही त्यांच्या पाउलावर पाउल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. वरवर पाहाता आभासी व कृत्रिम पद्धतीने साकार केलेले जग कुणाला ही भूरळ पाडू शकते. फेकलेल्या जाळ्यात मासोळी अलगद फसतच असते. अश्या प्रकारचे धोरण पाश्चात्त्य देशांची चतूर चाल आपण भोळे लोक समजू शकत नाही.


 पाश्चात्त्य संस्कृतीला great समजून आपण आपल्या देशाशी गद्दारी करीत आहोत .त्यांचा उदो उदो करुण खाण्यापासून तर कपड्यापर्यंत पराधीन बनत चाललो आहोत.तशे पहातो म्हंटल तर आपल्या काही भारतीयांना दूसऱ्यांची कॉपी copy करायला आवडते.

दूसऱ्याचे घुबडही डोक्यावर घेउन नाचायला तैयार असतात. म्हणुन आजमितीला पूर्ण जगात पाश्चात्त्य संस्कृती वरदानी सिद्ध होते आहे.पाश्चात्यिकरणाची छाप जिकडे तिकडे दिसते आहे.झपाट्याने ती वाढत आहे. ही पाश्चात्त्य शैली म्हणजे एक सुशिक्षितपणेचे व आधुनिकीकरणाचे लक्षण समझल्या जात असते.


 जरी त्यांची कार्य क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे. तरी पाश्चात्त्य संस्कृती प्राकृतिक नसून दिखावू आहे. तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळे प्रयोग करून सौंदर्यात अप्रतिम भर घातलेली आहे. ती लोके बुद्धीवंतांची इज्जत करतात बाकी कुणालाच काही समजत नाहीत. त्यांनी जसा आपल्या देशाला स्वर्ग बनविला व आपली छाप सर्व देशावर पाडली तो देश काही भूलभुलैया नाही बुद्धवाद्यांचा तो देश आहे. .पाश्चात्त्य देशांनी आपला ठसा उमटवून ध्येयाने, निष्ठेने,चतूराईने, कर्तृत्वाने चोरटेपणा करून,आपसात लावालावी करून,हिसकून आपले वर्चस्व दाखविले व सर्वांपेक्षा बलशाली राष्ट्र तयार केले आणि सर्वां देशापेक्षा श्रेष्ठ ठरला.

  

  आपली भारतीय संस्कृती ही महान संस्कृती आहे . ती आपणास बरोबर सांभाळता आली नाही. त्यात आपण कुठेतरी कमी पडतो व दुसऱ्या देशाच्या आहारी जातोय तिथला चमचमाट आपणास भूरळ पाडतो त्याला कुठे तरी आपणच जवाबदार असतो.आणि पाश्चात्त्य संस्कृतीला महत्व देत असतोय.आपण आपले घर स्वच्छ ठेवायच की नाही, कोणा दूसऱ्यांना शिर्काव करू द्यायचे की नाही, जशी पाश्चात्त्य संस्कृती कोणा दूसऱ्यांना आपल्या देशात स्थाईक करित नाही आणि इतर देशातील फक्त बुद्धीवंतांना काही काळ आसरा देवून यथेष्ट चाकरी करवतात.

 

 आपल्या संस्कृतीचा कायापलट आपण आपल्या मेहनतीने कतृत्वाने करतच आहोत.एक गोष्ट म्हणावीशी वाटते भारताची लोकसंख्या इतकी अफाट वाढत आहे की या जीवंत जीवांना जगविणे अत्यंत महत्वाचे आहे.आपल्या भारताला गरीबीचा शाप आहे.त्यातून जर बाहेर निघालो तर आपले culture सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे अनेक तत्वानी भरलेला सुंदर संस्कृतीचा महाउगम लाभलेला देश आहे.


 विवेकानंदांनी आपले वक्तृत्वाची चमक सर्व जगाला दाखविली होती ,अनेक महर्षी ,विद्वान,थोर पुढारी,"इथली शान आहे.साधी राहानी उच्च विचार"आपल्या संस्कृतीची धरोहर आहे.इथल्या विद्वान महापुरुषानी देश विदेशात बुद्धिमत्तेच्या जोरावर अटकेपार झेंडे लाविले होते.आता ही कित्येक विद्वान लोकं दिवसाची रात्र करून महा उपदेश देतांना दिसतात. विद्वानांनी आपल्या आयुष्याचा अर्धा काळ पश्चिमात्त्य देशात राहून त्याच्यांत काहीच बदल झालेला दिसला नाही त्याउलट आपल्या देशाचे नाव त्यांनी अजरामर केले होते.आपल्या देशीची किमया गाथा भरभरून गायली होती,चले जावचे नारे गुंजले होते तो नाद आजपर्यंत पश्चिमात्त्य देशाला विसरू देत नाहीत.


 त्याप्रमाने आज ही आपल्या भारत देशाची परंपरेचा इतिहास महान गनल्या जात असतो.ईथे सर्व जाती धर्म सांप्रदाय मोठ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि तशीच चुनूक आपल्या भारत देशातील कर्तबगारांनी दाखविली आहे.हजारो कार्य पुर्णत्वास नेले आहेत. चंद्रावर चंद्रयान पाठवून खुप मोठे कार्य केले आहे.तसेच Jammu Kashmir ,Ladakh 370 /35 हटवून "हम भी कुछ कम नहीं" हे दाखवून दिले आहे. तसेच प्रत्येक देशातील संस्कृती वेगवेगळी असते."चांगले ते घ्यायचे वाईट सोडून द्यायचे " प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा विचार करून काही चांगल्या गोष्टी अभ्यासाने अवगत केल्यास शाप न मानता त्या आपल्या देशासाठी वरदाना सिद्ध होवू शकतात.


   पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे भारतीय संस्काराच्या खूप विरुद्ध आहेत.चांगल्या गोष्टी घ्याव्यात अन वाइट गोष्टी सोडून द्याव्यात.परंतू पाश्चात्त्य संस्कृतीपासुन खूप काही शिकण्यासारख आहे. हे मात्र नक्कीच त्यांची दुरदृष्टी कौतूकास्पद आहे.त्यांची सौंदर्यदृष्टि, दुरदृष्टी, व्यवहारीक ज्ञान रोक-ठोकपणा. प्राणी मात्रावर निर्व्याज प्रेम करणे. स्वत:चा देश कसा सुंदर, सुरेख, स्वास्थ्यवर्धक ठेवता येईल अशी बहुवीध कामगिरी बजावतात .व जातीने पाळतांना दिसतात . स्वत:ची मानसे,स्वतःचे हित, स्वत:चा रूतबा कायम ठेवण्यासाठी कोणतीही कृती करायला मागेपुढे बघत नाही.ती स्वतःसाठी जगणारी selfish असते पण प्रेमळ व्यक्तित्वाचे धनी असतात.त्यांची जिद्द चिकाटी new शोध लावण्याचा ध्यास लहान मोठ्यात दिसतोय.आपल्या देशासाठी fighting ,benefit दोघांची भांडणे तिस-याचा लाभ अशी नितीमत्ता अवलंब करतांना दीसतात. 


  सुख समृद्धीच्या सर्व सुखसोयी असणे प्रगतीचे द्योतक आहे.परंतू आपण भारतीय त्याला नैतीक पतन किंवा नग्नता म्हणतोय.ती त्यांची संस्कृती व पंरपंरा आहे त्यात वाईट काहीच नाही. तिथे honest खरेपणा, ईमानदारी, प्रेम ,करूना प्रत्येक व्यक्तीमधे वाखानण्यासारखी आहे.पुरुष व स्त्रीयांमध्ये भेद नसतो. तिथे कधी rape होतांना दिसत नाही, कोणत्याच गोष्टीची कुणावरही जबरदस्ती नसते.स्त्रीया व पुरुष बरोबरीने कार्य करताना दिसतात.त्याचेही कारण आहे तिथे सर्व खुले वातावरण असते त्यामुळे लपवछपवी करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ती छोट्यामोठ्या गोष्टीत लक्षच देत नाही आणि सदैव कामात मग्न असतात. लहान मोठे प्रकल्प उभारून नव अविष्कार करीत असतात. लोकसंख्या कमीत कमी ठेवूनी सुदृढ, निरोगी आणि स्वच्छता ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतूक पात्र आहे.तिथे अंधश्रद्धा नाही त्यांना शनीची साढ़ेसाती माहित नाही. निव्वळ विज्ञानावर भरवसा करणारे शिस्तप्रिय आहे.आळसीपणा नाही बहूल बुद्धीत्ववादी म्हणुन त्यांची ख्याती आहे. 


तरी पण आपण आपल्या देशाची अस्मिता राखली पाहिजे. आपण पाश्चात्य अंधानुकरणाला पाठीशी बांधून भारतीय संस्कृतीला काळीमांच फासत आहोत.आजच्या पिढीला त्यापासून सावध रहाण्याची गरज आहे.आपण आपल्या गुणांचा educations चा वापर जर आपल्या देशासाठी केलात तर काही प्रमानात लागलेला हां शापित कलंक धुवून काढायला मदतच होईल आहे.


पाश्चिमात्य संस्कृती झपाट्याने आपल्या जीवनात शिरकाव करत आहे. आणि आपणही त्याला तितक्याच वेगाने बळी पडलेलो आहोत.आणि आहारी गेलेलो आहोत. आपण आपल्याच ऊज्वल संस्कृतीची हेळसांड करून चार पैशाकरीता स्वत:ची बोली लावतो आहे. आयत्या बिळात नागोबा होवून राहाण्याची स्वप्न बघतो आहोत. आज या जगात आपल्या भारतीय संस्कृतीला अतीशय सन्मान आहे पण इथल्या लोंकाच्या नजरेत पाश्चिमात्य देश महान आहेत. आपल्या संस्कृतीला वाचवायची असेल तर आपण तटस्थ भूमिका घेतली पाहिजे.

 

  आपल्या संस्कृतीत आपण शेती मातीशी जुळून असतोय. माया, ममता, करुणा अंगोपांग भरून वाहते. आणि परिवारिक कुटुंबाला घेवून भावनीक विश्वात रममान असतो व प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करित असतो. सोबत भाईचार,सद्भावना, सनवार, पुजाअर्चना, पारीवारीक सोहळे, आनंदाची पर्वनी काही ठीकानीच उरलेली आहे. अन्यथा मन विषन्न करणारी कृती बघायला मिळतेय. क्षणोक्षणी भयाचे सावट व कार्यकर्त्यांचे प्रदर्शणच दिसतेय. विद्यार्थी विद्रोह करतांना कर्मचारी हड़ताळ करतांना, राजनीती मध्ये द्वंद व सत्ता लोलुपता ,पडदा पद्धती, योनशोषण, बलात्कार, आतंक, गरीबी, भूकमरी, प्रदूषण, ठगी, बणवाबणवी, चोरीचकारी, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व गोष्टी देशाची शान वाढवित आहे. जिकडे तिकडे अनैतीक कामाचा बोलबाला आहे. म्हणुनच चुंबकासारखे आपण अनुकरण करण्यास पर्यायी वाटेचा शोध घेत आहोत. त्यामुळे पाश्चात्त्य संस्कृतीला कौतूकाची शाबासकी मिळाली आहे.त्यावरून पाश्चिमात्य संस्कृती ही शाप नसून वरदान आहे.बहूतेक गुण त्यांचे घेण्यासारखेच आहेत.Rate this content
Log in