Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

::::: पाहिजे :::::

::::: पाहिजे :::::

1 min
149


   माणसाला या पृथ्वीवर जन्म घ्यायला कितीतरी पुण्य करावे लागते तेव्हा कुठे या सुंदर पृथ्वीवर जन्म मिळतो. या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर माणसाने माणुसकीने वागले पाहिजे. माणुसकी संपन्न जीवन जगले पाहिजे. माणसाला मरावे वाटले तर तो केव्हाही मरु शकतो पण जन्म तसे नाही.

    जन्म हा माणसाच्या हातात नाही. यावर ईश्वराची कृपा असावी लागते. या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे जीवन जगता आले पाहिजे. सुख भोगता केव्हाही येते पण दु:ख पचवता आले पाहिजे. यशाने माणूस उंचच उंच शिखरावर जातो पण त्याचे पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून जीवन जगता आले पाहिजे.

     या पृथ्वीवर माणूस कळत न कळत पाप करतो. किंवा जाणूनबुजून पाप करतो.पण पापाऐवजी पुण्य करता आले पाहिजे. ताठ मानेने कुणालाही जगता येते पण जरा झुकून जगता आले पाहिजे. जीवन जगताना माणसाला ठेच लागते. त्याची वेदना सहन करता आले पाहिजे. शहाण्याचे सोंग घेऊन वडयासारखे जगता आले पाहिजे. 

    कशालाही बळी न पडता चांगल्याप्रकारे जीवन जगता आले पाहिजे. हस्य आणि अश्रू चा मिलाप करून समाधानी राहता आले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे. जीवन जगताना मनुष्य जीवनात एकमेकाला साथ दिली पाहिजे. इतरांच्या सुख, दु:खात सहभागी झाले पाहिजे. एखाद्याचा मुलगा यश संपादन केला तर त्याचे कौतुक केले पाहिजे. संकट समयी एकमेकाला साथ दिली पाहिजे.!!!!!. 


Rate this content
Log in