"प" ची करामत
"प" ची करामत
मराठी भाषेत प्रत्येक अक्षरापासून अनेक अर्थ निर्माण होतात. आणि त्या प्रत्येकाचे पण अनंत अर्थ होतात. त्या अक्षरापैकी 'प' या अक्षराची करामत पाहू या .
जे मिळते ते या 'प' पासून आणि जे मिळत नाही तेे पण या 'प' पासूनच .
प पासून पती
प पासून पत्नी
प पासून पुत्र
प पासून पुत्ररी
प पासून परिवार
प पासून प्रेेम
प पासून पैसा
प पासून प्रतिष्ठा
प पासून पद
प पासून प्रशंंसा
प पासून पार्टी
प पासून पब्लिसिटी
प पासून परीक्षा
प पासून प्रीत
प पासून पोवाडा
प पासून प्रेरणा
प पासून पेरणी
प पासून प्राण
या 'प' च्या मागे लागुन लागुुुनच आपण 'प' पासून 'पाप' करत राहतो. आणि मग आपले ''प' पासून पतन होते. आणि शेवटी शिल्लक राहते 'प' पासून पश्चाताप होतो.
माणूस आपल्या चलती मध्ये पाप, पुण्याकडे पाहत नाही. आपल्याला जसे वाटेल तसे
वागत असतो. फक्त आपला स्वार्थ पाहतो.
आणि तो जेव्हा उतारवयात येतो तेव्हा
त्याला कळू लागते. आणि त्याला पश्चातापाशिवाय काहीही शिल्लक राहत नाही.
तेव्हा उदास होतो, नाराज होतो.
पहा 'प' ची करामत.
