Author Sangieta Devkar

Children Stories Inspirational

4.6  

Author Sangieta Devkar

Children Stories Inspirational

ओवी

ओवी

4 mins
331


अग ओवी चल ना बाहेर खेळू तू काय सारख ते मोबाइल वर गेम खेळत असतेस? वैशु ओवी ला खेळायला नेत म्हणाली.

वैशु दोन मिनिटं झालीच पूर्ण ही गेम माझी मग जाऊ.

ओवी ठेव तो मोबाइल आणि जा बाहेर . नीता तिच्या हातातला मोबाईल घेत बोलली.

मग ओवी आणि वैशु बाहेर गेल्या. सोसायटी च्या गार्डन मध्ये सगळी लहान मूल खेळत होती. ओवी ने वैशु ची ओळख आपल्या मित्र मैत्रिणी ना करून दिली,हॅलो फ्रेंडस ही माझी कजिन सिस्टर कालच गावा हुन आलीय. मग सगळे जण पकडापकडी खेळू लागले. ओवी पटकन सापडत होती कारण तिला फास्ट पळता येत नवहते तर वैशु जोरात पळत होती. ओवी जरा खेळली की दमत होती पण वैशु अजिबात नाही दमली. वैशु ने गावा कडचे बरेच खेळ त्या मुलांना शिकवले थोड्याच वेळात वैशु सगळ्याची आवडती बनली.ओवी दमून एका जागी बसली. अंधार पडायला लागला तसे सगळे घरी गेले. वैशु तू उद्या पण ये लवकर खेळायला आज खूप मजा आली अस सगळे बोलत होते.


ओवी वैशु घरी आल्या. "आई, मला भूक लागली लवकर खायला दे. ओवी घरात आल्या आल्या म्हणाली.

ओवी आता वरचा खाऊ नको खाऊ स्वयंपाक होतोय जेवयलाच बस.

नाही आई मला खूप भूक लागली आहे असं म्हणत ओवीने चिप्स खायला घेतले. वैशु ला ही दिले.

रात्री सगळे जेवयाला बसले. ओवी आई बाबा,आजी आणि वैशु. वैशु ही ओवी च्या काकांची मुलगी सुट्टीला इकडे आली होती. जेवताना ही ओवी चे नखरे ही भाजी नको. ते नको अस चालू होते मात्र वैशु सगळं जेवण आनंदात खात होती. ओवी वैशु पण तुझ्या एवढीच दहा वर्षाची आहे बघ ती सगळं खाते. आई म्हणाली

मला नाही आवडत आई. ओवी म्हणाली आणि उठून गेली . मोबाईल घेऊन गेम खेळत बसली. ओवी ला मोबाईल गेम,आणि कार्टून बघणे हेच जास्त आवडत होते. थोडे दिवस राहून वैशु गावाला निघाली तेव्हा ओवी ही तिच्या सोबत जायला तयार झाली. थोडा बदल होईल आणि मोबाइल पासून ओवी लांब राहील म्हणून तिच्या आई ने काका सोबत ओवी ला ही गावी पाठवले.

गावी त्यांचे मोठे घर होते. खेळायला मोठे अंगण,विहीर,अंगणात भरपूर झाडी. स्वच्छ वातावरण. वैशु संध्याकाळी ओवी ला घेऊन खेळायला आली. ही कोण ग मुलगी अस वैशुच्या मैत्रिणी नी ओवी ला बघून विचारले.

ही माझी बहिण आहे सुट्टी ला आली आहे असं वैशु ने सांगितले.

वैशु ही किती जाड आहे ग . पोट बघ की कस बाहेर आलंय हीच अस एक जण म्हणाली आणि बाकी सगळे मग ओवी कडे बघून हसु लागली.

रागाने मग ओवी घरात आली. तिच्या मागे वैशु आली. ओवी मी त्यांना ओरडले खूप आता कोणी तुला चिडवणार नाही चल

नको वैशु मी नाही खेळत.

अरे काय झालं वैशु तुम्ही खेळायला गेला होता ना? काकांनी विचारले . तेव्हा बाहेर जे झाले ते वैशु ने तिच्या बाबाना सांगितले.

ओवी बाळ हे बघ तुला खेळताना लगेच दमायला होते का सांग मला.?

हो काका. मी फास्ट पळू पण नाही शकत. त्यामुळे मी जास्त खेळत पण नाही मग मोबाइल वर गेम खेळत बसते.

ओवी हे सगळं त्या मोबाइल आणि टी व्हि मुळे तर झालंय. आता कोरोना काळात तुमचे ऑनलाइन क्लास सुरू होते त्यामुळे घरातच होता तुम्ही मुल. त्या नंतर ही मोबाईल आणि टॅब ची सवय तुम्हाला जास्त लागली. मोबाइल गेम आवडू लागले मग नुसतं बसून खेळायचे आणि चिप्स,कोल्ड्रिंक्स प्यायचे यामुळे वजन वाढत गेले. आता तू खूप लहान आहेस ओवी तरी तुला खेळताना त्रास होतो मग विचार कर पुढे तुला अजून किती त्रास होईल? हेच वजन वाढत गेले तर तुला चालायला ही त्रास होईल. आणि वाढलेले वजन कमी नाही झाले तर भरपूर आजार आपल्याला होतात.

काका मला नाही जाड व्हायचे. आमच्या सोसायटीत एक आंटी आहेत त्यांचं पोट खूप मोठं झाले आहे त्या नीट चालू पण नाही शकत आणि त्याची मुल तर माझ्या एवढीच आहेत.

मग बघा ओवी तुला हे समजले तर की वजन जास्त असेल तर चालायला ,खेळायला त्रास होतो. आपले फ्रेंडस पण मग चिडवत राहतात.तस तुला कोणी चिडवायला नको असेल तर मी सांगेन तस कर .

ठीक आहे काका मी ऐकेन तुमचे ओवी म्हणाली.

दुसऱ्या दिवसा पासून काका,वैशु आणि ओवी ला पोहायला,पळायला,कधी शेतात छोटी छोटी काम करायला सोबत घेऊन जाऊ लागले. सगळ्या भाज्या आणि फळे खायची सवय ओवी ला लावली.महिना भर ओवी गावी राहिली. तिथले शुद्ध आणि स्वच्छ वातावरण तिला आवडले. मोबाईल गेम आणि टीव्ही विसरून गेली. वैशु सोबत भरपूर खेळुन मग व्यवस्थित जेवण ही करू लागली.

सुट्टी संपली आणि ओवी घरी आली . काकांनी तिला बजावले होते की मोबाइल आणि टी व्ही पासून दूर राहायचे. ओवी सगळं गावी करायची तसच इथे ही तिने स्विमिंग चालू केले. भरपूर खेळ खेळत राहिली. जेवणा साठी आता तिचे कसलेच नखरे नवहते. ओवी मधील हा बदल आई ला खुप सुखावून गेला.


समाप्त 


Rate this content
Log in