ऑपरेशन
ऑपरेशन
1 min
210
जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी जेव्हा ती पटांगणात आली तेव्हा इतर स्पर्धक मंडळी टीशर्ट, जीन्स, स्पोर्ट शुज घालून धावण्यासाठी सज्ज होती.ती मात्र एकटीच लुगड्याचा काचा खोचून अनवाणी पायाने त्या सर्वा सोबत धावणार होती.
शर्यत सुरू झाली तशी ती एका वेगळ्याच आवेशाने धावत सुटली आणि स्पर्धेत पहिली आली. टाळ्यांच्या कडकडाटात तिने बक्षिसाची रक्कम स्वीकारली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. कारण नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी ती खेड्यातून शहरात आली होती आणि पैशाअभावी रखडलेले ऑपरेशन आता या पैशातून होणार होते.
