End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Swapnil Kamble

Others


1  

Swapnil Kamble

Others


ऑनलाईन शादी

ऑनलाईन शादी

3 mins 196 3 mins 196

लोकांचे निकाह एक महिना अगोदरच घेतले. काहीनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. करोना वायरसने जीवनात बदल घडवून आणले.


तोंडाभवती एक मास्क बांधून त्याने चंद्राकर गोल आकार आला होता. तोंडाला राशेस पडलेले चेरे,मास्कमुळे कित्येक दिवस,मास्कमुळे मेक अप केलेले चेहरे दिसत नव्हते,मास्कमुळे चोर गर्दुले या गर्दीचा फायदा घेत होते. cctv कॅमेरामध्ये चेहरे दिसत नव्हते. मास्क मागणी वाढत होती. डुप्लिकेट युज अँड थ्रोचा वापर वाढला होता.


२१ मार्च लग्नाची तारीख फिक्स केली होती. लग्नाची पत्रिका एक महिना अगोदर सग्यासोयऱ्यांना, नातेवाईक, मित्रमंडळी,यांना वाटुन झाल्या होत्या. लाॅकडाऊन जाहीर झाला.रहदारीस सक्त मनाई केली होती.लग्न कार्य तशीच लोंबकळत पडली होती.माझ्या मित्राचं ‌लग्न २१ मार्चमध्ये ठरले होते.हाॅल बुकिंग केला होता.दोन लाख एका दिवसाचे भाडे होते.सभागृहावर बंदी घालण्यात आली होती म्हणून हाॅलमालकाने भांड परत केले.लग्न हे आयुष्यात एकदाच येते,हा क्षण पुन्हा पुन्हा येत नाही,अर्धीनिम्मी पत्रकं वाटुन झाली होती.पत्रिकेत आता बदल करता येणार नव्हता.लग्न पुढे ढकलता येणार नव्हते.काही मित्रांनी मिळून एक शक्कल लढवली.व्हाट्अप ग्रुप व फेसबुक ग्रुप बनवला.सर्व नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळी, पाहुणे मंडळींची मोबाईल व फेसबुक पेजवर लिंकवर मेसेज केले की,


लग्न ऑनलाईन होणार त्याच दिवशी"हे कसे शक्य आहे, लाईव्ह कास्ट करुन" लग्न करायचं.


हो, हे शक्य आहे,आपण सोशल मीडियाचा वापर करून, आपण डायरेक्ट लिंकद्वारे लाईव्ह करायचे,तेही सर्वांच्या साक्षीने, लाईक बटनचा वापर करून अक्षता पाडू शकतो. लाईक कॉमेंटने आपण सोशल नेटवर्किंग साइटवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार, प्रत्येकाला लिंक शेअर करून आपण संपर्क करू,


माझा एक मित्र सोशल नेटवर्किंग इंजिनिअर आहे,तो हे काम निट करेल,तो एक चांगला अभ्यासक आहे.लग्न सोहळ्यात वराची मंडळी त्याच्या घरी व वधूची मंडळी तिचा घरी असणार, घरीच लग्न मंडपाचा लुक द्यायचा, वधू वरास सजवले जाते, मेकअपची सोय केली होती, वधू वराची कपडे घालून उभे करण्यात आले होते. फेसबुक वरती पहिल्यांदाच होणार होते, प्रथमच एका रूममध्ये लग्न करायचं होतं.रुम हॉलसारखी सजवली होती.जमावबंदीमुळे दोन्ही पार्टीकडून लाईव्ह कास्ट करायचे ठरले.अशोक सराफच्या फिल्मप्रमाणे, अश्विनी ये ना,जगु कसा तुझ्या विना मी,तु तिकडे मी येथे,


अशी फजिती झाली होती पण लग्न हे लाईव्ह करणार अशी मित्राने जिद्द धरली होती. पण लग्नमुलीला आम्ही तिच्या घरी वधूच्या ड्रेसमधे उभे राहायला सांगितले व वराला आम्ही वराच्या ड्रेसमधे उभे राहायला सांगितले,आणि दोन्ही पार्टीचा एकच व्हिडिओ एडिट करून,बघणाऱ्याला वाटले पाहिजे की,मधे अंतरपाट अशा प्रकारे आम्ही एडिट केला होता व लाईव्ह टेलिकास्ट केला होता.फेसबुक युजर्सना आम्ही लिंक शेअर केली होती.लग्नाची तारीख व वेळ दिलेली होती.सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते.लग्न लावून देणारे आचार्य त्यांचा घरी सर्व पूजेचे सामान घेऊन वधू वरास मार्गदर्शन देत होते. तीन लाईव्ह व्हिडिओ आम्ही लाईव्ह cast केले होते.एक लग्न लावणाऱ्या अाचार्यांचा दुसरा वधूचा व तिसरा वराचा... लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी user आतुरतेने वाट पाहात होते एखाद्या वेबसेरिज सारखे,कधी लग्नाला सर्वात होते,कधी आचार्य मंत्र बोलतोय कधी,अक्षताचा पाऊस पडतोय.अशी घाई झाली होती.अडचण येत होती ती,वधू वरांना हार घालताना कसे दाखवायचे मग,वधूला प्रथम हार हातात घ्यायला सांगितला व वरालाही हार हातात घ्यायला सांगितला. मग शेवटचे मंत्र आचार्यने उच्चारल्यावर हार आपआपल्या गळ्यात घलायचा आम्ही मग व्हिडिओ एडिट करून तो वधू व वर एकमेकांना हार घालतात असे दाखवले,मंगळसूत्रची वेळ आली तेव्हाही वधूला मंगळ सूत्र स्वतःच गळ्यात घालायला सांगितले व आम्ही ते वरच ते घालत आहे असे भासवले.मग लाईकचा वापर करून नातेाइकांकडून अक्षता शेअर करायला सांगितले. वधुला कुंकू लावताना ते फक्त पिंजभर पिंजर बोट धरून हात वर करून ॲक्ट करायचा होता.आणि वधूचा स्वतः पिंजर स्वत:च हाताने लावायची होती,मग आचार्यने शेवटी शुभ मंगल सावधान बोलून .....लग्न संपन्न झाले असे बोलून ...ज्यांना अहेर द्याचा आहे त्याने google pay through pay करण्याची सोय करण्यात आली होती.


आता फक्त आनंदाश्रु टपकायचे बाकी होते.लाईक्स व कॉमेंट दीड लाख चा वर होत्या.आता फक्त वधू वर एकत्र यायचे होते. पाच पत्रवनचे जेवण शिल्लक होते.


Rate this content
Log in