Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Others


4.0  

Sangieta Devkar

Others


ओझे अपेक्षांचे

ओझे अपेक्षांचे

9 mins 448 9 mins 448

निधी आणि नितेश ऑफिस ला जायची तयारी करत होते सकाळी खूप घाई असायची त्यातून वेळेवर ट्रेन मिळाली तर ठीक नाहीतर उशीर ठरलेलाच. निधी काम आवरत शुभम ला सूचना ही देत होती. शुभम वेळे वर कॉलेज ला जा,उगाच लेकचर बंक करायचं नाही आणि संध्याकाळी नीट ट्युशन ला जा. इकडे तिकडे भटकू नकोस. तसा शुभम म्हणाला,आई रोज काय तेच तेच सांगतेस मी लहान आहे का आता अकरावीत आहे मी मला समजत सगळं. अरे इतका पण मोठा नाही झालास हे अड निड वय आहे तुझे काळजी वाटते म्हणून सांगते मी. त्यांचं बोलणं ऐकून नितेश ही म्हणाला,शुभम आई सांगतेय ते बरोबर आहे सायन्स ला आहेस तू फक्त अभ्यासा कडे लक्ष दे . हो बाबा माहीत आहे मला जातो मी आता म्हणत शुभम कॉलेज साठी बाहेर पडला. रोज रोज हेच ऐकायचं कंटाळा आला होता त्याला,मुळात त्याला सायन्स विषय घ्यायचाच न्हवता पण आई वडिलांच्या हट्टा पायी त्याचे कोण ऐकणार. शुभम ला आवड होती ती संगीतात, त्याला गिटार वर गाणी गायला खूप आवडायचे.गेल्याच वर्षी त्याने हट्टा ने वाढदिवसाला गिटार घेतली होती. एकुलता एक लाडका मुलगा म्हणून त्याची सगळी हौस मौज होत होती. पण त्याने शिक्षण काय आणि कोणत्या शाखेतुन करायचे याचा निर्णय सर्वस्वी निधी आणि नितेश ने घेतला होता. शुभम कॉलेज ला गेलाच नाही. तो दुपार पर्यंत नुसता फिरत होता मग घरी आला जेवण करून गिटार घेऊन बसला. त्याचा विरंगुळा होता गिटार त्याच पॅशन होत म्युजिक पण त्याच्या आवडी निवडीला इथे वाव न्हवता. शुभम नावालाच कॉलेज ला जात होता त्याचे नोटस पूर्ण न्हवते तो सबमिशन वेळे वर देत नसायचा.


संध्याकाळी निधी नितेश घरी आले. आल्या आल्या निधी ने सांगितले की ती दोन दिवस बाहेर गावी जातेय कामा निमित्त. तसा नितेश म्हणाला,तू दोन दिवस नसणार घरी मग शुभम कडे कोण बघणार मला ही लेट होतो निधी तू ऑफिसमध्ये सांगायचे ना की तुला नाही जमणार जायला. नितेश मी कायम जाते हे तुला माहीत आहे आणि 2 दिवस तू लवकर आलास तर कुठे बिघडले ? हो माहीत आहे कायम जातेस पण आता शुभम अकरावी ला आहे पुढच्या वर्षी 12 वी त्याच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. मला जमणार नाही निधी तू तुझे बघ. का नाही जमणार ऑफिसमध्ये असे काय काम असते तुला एकदा वर्क हावर संपल्यावर,नुसता टाईमपास तर चालतो ना त्या रश्मी सोबत निधी बोलली तसा नितेश रागात म्हणाला,व्हॉट डु यु मिन टू से,तू कायमच का संशय घेतेस माझ्यावर. का नको घेऊ संशय नितेश पाहिलेत तुम्हा दोघांचे चॅट मी गुड मॊर्निंग डियर सो स्वीट ऑफ यु नितेश आणि काय एफ बी वर तुझ्या फोटो ला लवली ,माईंड ब्लोविंग असे कमेंट्स, तू फोटो टाकायचा अवकाश ती बया कमेंट टाकणारच लगेच हे मला समजत नाही का इतकी पण मूर्ख नाही मी निधी म्हणाली. निधी रश्मी माझी कलीग आहे आणि चांगली मैत्री आहे आमची म्हणून ती तसे कमेंट देते दयाटस ऑल. आणि तुझे मित्र नाहीत का तुला कमेंट करत,सो क्युट,अतिसुंदर अशा तेव्हा मी पण डॉऊट घ्यायला पाहिजे का तुझ्यावर? तू कशाला डॉऊट घेशील तु शेण खातोस मग मला कोणत्या तोंडाने बोलणार ना ती बोलली. दोघे एकमेकांना दोष देत जोर जोरात भांडत होते. हे नेहमीचेच होते शुभम त्याच्या रूम मधये बसून सगळं ऐकत राहायचा मग हे असह्य झालं की गिटार घेऊन तासनतास गॅलरी मध्ये बसायचा एकटाच. गिटार वाजवत राहायचा मन शान्त करायचा. सकाळी निधी ऑफिस च्या कामा साठी बाहेरगावी गेली. नितेश त्याच आवरून ऑफिस ला गेला. कामवाल्या मावशी येऊन स्वयंपाक आणि इतर काम करून गेल्या . शुभम एकटाच शून्यात स्वहताला हरवून बसला. त्याच्या मनात यायचं कोणा साठी मी चांगलं शिकायचं? चांगले करियर करायच आई बाबा म्हणेल ते देतात पैसा हवा तेवढा पण अपेक्षा काय त्यांची की मी इंजिनियर,डॉकटर,व्हावं किंवा आय आय टी मध्ये जावं. पण मला काय बनायचं मला काय आवडत याचा कोणीतरी विचार का करत नाही? विचार करून करून त्याच डोकं दुखू लागलं.


दोन दिवसांनी निधी घरी आली. शुभम घरीच होता त्याला बघून तिने विचारले शुभम कॉलेज ला गेला नाहीस ? नाही गेलो माझं डोकं दुखते आहे. अरे डोकं दुखते म्हणून कॉलेज बुडवलेस तू किती अभ्यास बुडाला तुझा तुला काही अभ्यासाचा सिरीयसनेस आहे की नाही तुला माहीत नाही का किती फी भरून त्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवली ते अस घरात बसून राहायला का? तसा शुभम पण भडकला म्हणाला,आई मी न्हवते सांगितले इतक्या महागड्या कॉलेज ला मला घाला म्हणून ,मला साधे विचारले पण नाही मुळात मला सायन्स ला जायचेच न्हवते. शुभम काय मूर्खा सारख बोलतोस अरे लोकांना इतकं चांगलं शिक्षण मिळत नाही पैसा नसतो त्याच्या कडे,आणि तुला सगळं मिळत तरी शिकायला नको. यासाठी तुझे सगळे हट्ट पुरवले का लहानपणापासून,जरा विचार कर उच्च शिक्षण नसेल तर या जगात तुला कोणी जवळ करणार नाही नोकरी चांगली मिळणार नाही. पैसा नसेल तर काहीच होणार नाही. आई मला नको आहे असला पैसा जो मनशांती हिरावून घेतो जो नात्यांना तोडतो तो म्हणाला. शुभम तू लहान आहेस अजून तुला जगा बद्दल काहीच माहिती नाही ,मुकाट्याने रोज कॉलेज ला जायचे समजले. शुभम तणतणच रूम मध्ये गेला. संध्याकाळी नितेश घरी आला तेव्हा तिने शुभम बद्दल त्याला सांगितले तर तो म्हणाला,तुझे लक्ष असेल घरा कडे तर ना,मुलगा काय करतो कुठे जातो तुला माहित तरी असते का? तू फिर ऑफिस टूर करत. निधी चिडली म्हणाली, शुभम काय माझ्या एकटीची जबाबदारी आहे का? तू पण बाप आहेस त्याचा कधी तरी त्याला वेळ दे,चार गोष्टी समजून सांगत जा ना. त्यांचा आवाज ऐकून शुभम रूम मधून बाहेर आला म्हणाला,आई बाबा प्लिज जरा शांत बसा किती सारख भांडता तुमच्या या भांडणाचा कंटाळा आला आहे मला, जीव द्यावासा वाटतो मला बास आता. तशी निधी ने त्याला जोरात कानशिलात लगावली म्हणाली,या साठी तुला इतका मोठा केला का ? नितेश म्हणाला, तुझेच लाड आहेत भोग तूच आता . हा दिवटा काय अभ्यास करणार आणि काय बनणार उद्या ? निधी फक्त अश्रू ढाळत राहिली. दुसऱ्या दिवशी शुभम च्या कॉलेज मधून निधी ला फोन आला की शुभम ला घेऊन ताबडतोब या. नितेश ला सांगितले तिने तसे पण तो बोलला मला वेळ नाही तू जा.


निधी शुभम ला घेऊन कॉलेज ला आली तिथे तिला समजले की शुभम वरचेवर कॉलेज चुकवतो त्याचा अभ्यास पूर्ण नाही. आला तरी लेक्चर बंक करतो. एक ही प्रॅक्टिकल त्याने पूर्ण केले नाही. कॉलेज चे प्राचार्य म्हणाले आता तुम्हीच सांगा आम्ही याला काय शिक्षा द्यायची. मुलांना सगळं दिल हवा तितका पैसा पुरवला म्हणजे आई वडिलांची जबाबदारी संपली असे होत नाही मुलां कडे नीट लक्ष पण देता यायला हवे. तसे निधी म्हणाली आमचे चुकले सर याला एकदा माफ करा तो पुन्हा असे नाही करणार. बर ठीक आहे प्राचार्य म्हणाले. घरी येऊन पुन्हा निधी खूप बोलली शुभम ला पण त्याचा एकच ठोका मला सायन्स मध्ये इंटरेस्ट नाही मला जमत नाही तो अभ्यास. अरे शुभम मग काय करायचं तुला? आई मला म्युझिक मध्ये आवड आहे मला गिटार वाजवायला आवडत. शुभम पण त्यात करियर नाही होऊ शकत एक हौस म्हणून आवड म्हणून ठीक आहे रे पण करियर साठी चांगले उच्च शिक्षण हवे हे तुला का समजत नाही आता तू बारावी ला जाशील अजून अभ्यास जास्त करायला हवा तेव्हा कुठे तुला चांगल्या विषयात ऍडमिशन मिळेल. एन्ट्रान्स एक्झाम पण असतील तुला हवे तिकडे जाता येईल सॉफ्टवेअर,केमिकल,इलेक्ट्रॉनिक इंजिनियर,एम बी बी एस. आई मला यातल काही ही व्हायचे नाही शुभम म्हणाला. निधी कपाळाला हात लावून बसली. घरी आल्यावर नितेशने विचारले का बोलवले होते कॉलेज ला? निधी ने जे घडले ते सगळं सांगितले तसा तो ही भडकला आणि शुभम ला वाटेल तसे बोलू लागला. शुभम ला ते बोलणे सहन होईना त्याने दोन्ही हाताने आपले डोके घट्ट पकडले म्हणाला बास माझे डोके दुखते बाबा. तसा नितेश म्हणाला, कशाला नाटक करतोस? आम्हाला समजत नाही का अभ्यास चे नाव काढले की डोके दुखते का तुझे. नितेश खूप बडबडत होता आणि अचानक शुभम खाली पडला तसे निधी ओरडली, शुभम काय झाले तुला म्हणत त्याला उठवू लागली पण तो डोकं धरून म्हणत होता आई खूप दुखतंय ग डोकं माझं आणि डोळे बंद केले त्याने.


नितेश त्याला घेऊन डॉकटरकडे आला. डॉक्टरांनी त्याला चेक केले एक इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणाले शुभमच्या काही टेस्ट कराव्या लागतील त्या करून घ्या. ओके म्हणत निधी त्याला घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी सगळ्या टेस्ट करून घेतल्या दोन दिवसांनी रिपोर्ट येणार होते. निधी काळजीत होती आई होती ती किती ही मुलाला बोलली तरी तिचं मुलाप्रति प्रेम, माया अटणार न्हवती. रिपोर्ट मिळाले त्यात शुभमला मायग्रेनचा त्रास असल्याचं निष्पन्न झाले. निधी आणि नितेश च्या भांडणा मूळे हा त्रास झाला होता. रिपोर्ट पहिल्या वर डॉकटर शुभमला म्हणाले शुभम तू कसला इतका विचार करतोस असा कोणता ताण आहे जो तुला असह्य झाला की त्याचा परिणाम म्हणून हा मायग्रेन चा त्रास उदभवला. पण शुभम काहीच बोलला नाही. डॉक्टरनी ओळखले ते म्हणाले निधीला,तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा मला शुभम शी बोलायचे आहे. शुभम ने डॉक्टरना सगळे सांगितले त्याला संगीतात रुची आहे पण आई वडीलांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत त्याचाच ताण त्याच्या मनावर होता.


डॉक्टरांनी निधी आणि नितेश ला दुसऱ्या दिवशी बोलवून घेतले म्हणाले शुभम बद्दल महत्वाचे बोलायचे आहे . ते दोघे गेले. डॉकटर म्हणाले,तुम्ही शुभम चे आई वडील आहात मग मला सांगा तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टी आवडतात ? त्याची आवड कोणत्या विषयात आहे ? तो कॉलेज ला न जाण्याचं कारण काय ? त्याचे मित्र कोण आहेत ? माहीत आहे का तुम्हाला ? नाही ना काही माहिती मग कशा वरून तुम्ही स्वहताला शुभम चे पालक म्हणवून घेता? तुमच्या मुलाचा तुम्ही विचार करत नाही तर त्याचे आई वडील म्हणून कसे काय स्वहताला पाहता? त्याच्या समोर सतत तुम्ही भांडता,एकमेकाला नाव ठेवता,दोष देता आणि या परिस्थितीत त्याने चांगला अभ्यास करावा अशी अपेक्षा करता? मिस्टर नितेश मुलाना हवा तितका पैसा दिला,मागेल ते दिले मोठया कॉलेज मध्ये भरमसाठ फी देऊन ऍडमिशन घेतली म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले असे तुम्हाला वाटते का? का तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलांवर लादता त्याला हवं ते शिक्षण घेऊ द्या काय फरक पडनार आहे जर त्याने उच्च शिक्षण नाही घेतले नाही जास्त पैसा कमावला? पण त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला शिकू द्या मग बघा तो कसा मन लावून शिकेल का तुम्ही त्याला या जीवघेण्या स्पर्धेत पळायला भाग पाडता नाही द्यायची त्याला सी ई ट ना आय आय टी म्हणून काय तो चांगला माणूस नाही बनणार? मी जे केले तेच माझ्या मुलांनी करावं आम्ही सांगतो तेच ऐकावं हा अट्टाहास कशा साठी? इतके पैसे भरले ट्युशन लावली आता फक्त अभ्यास कर हे सांगण्या आधी तुम्ही मुलाला विचारले का की तुला काय करायचे आहे? आम्ही तुझ्या साठी कमवतो,कष्ट करतो हे मुलाला का बोलून दाखवता? मुलाला जन्माला घालायचा निर्णय तुमचाच होता ना मग त्याच्या वर इतके खर्च केले हे बोलून का दाखवता? उलट तुमची परिस्थिती,तुमचे कष्ट मुलांना दाखवून दया मग बघा ते किती हिरीरीने अभ्यास करतात,त्यांना जरा समजून घ्या,त्यांच्या कलान घ्या. उगाच तुमच्या अपेक्षा त्यांच्या वर लादून त्यांचा ताण वाढवू नका यामुळेच मुले आत्महत्या ही करायला तयार होतात. मुलाना तुमचा पैसा नको तर तुमचा वेळ हवा आहे,प्रेम हवे आहे. आम्ही सोबत आहोत हा विश्वास हवा आहे. बघा विचार करून. तसे निधी म्हणाली,डॉक्टर आमचेच चुकले आम्ही म्हणावे तितके लक्ष शुभम कडे दिले नाही. तो मागेल ते देत आलो पण वेळ नाही देता आला. हो डॉक्टर आम्ही शुभम च्या मनाचा विचारच कधी केला नाही आम्ही आमच्याच भांडणात मग्न होतो खरच चुकलो आम्ही नितेश म्हणाला. डॉक्टर म्हणाले,अजूनही वेळ गेली नाही. शुभम हुशार आहे त्याला म्युझिक मध्ये करियर करायचे आहे. त्याला समजून घ्या. आपल्याकडे लता मंगेशकर,सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण डोळया समोर आहे. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवले आहे कारण त्यांना त्यात आवड होती. हो डॉक्टर तुमचे म्हणणे पटले आहे आम्हाला आम्ही नक्की शुभमच्या मनाचा विचार करू. त्याची काळजी घेऊ निधी म्हणाली. डॉक्टर म्हणाले तुम्हाला तुमची चूक वेळेवर समजली हे छान झाले.


निधी नितेश ने ठरवले आता शुभमला जे हवे ते करू द्यायच त्याला आनंदी ठेवायचं. आज जो तो धावतो आहे भौतिक सुखा साठी,पैशा साठी रात्रंदिवस कामच काम करत आहे. सगळ्याना सगळं काही हवे आहे . मला जे जे हवं ते मी मिळवणारच हा अट्टाहास प्रत्येकाचा आहे. मला जे जमले नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवावं अशी अपेक्षा केली जाते. किंबहूना त्या मुलांवर लादल्या जातात आणि हा ताण मुलांना जेव्हा असह्य होतो तेव्हा ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. याला काही पालक अपवाद ही आहेत. पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे ती नीट पार पाडणे ही पालकांची जबाबदारी असते. "सुख पैसा प्रसिद्धीच्या शर्यती मध्ये धावायचे आहे इथे नंबर वन प्रत्येकालाच बनायचे आहे. पुस्तकाच्या ओझ्या खाली दबून गेलं बालपण. कधीच करपून गेलं आहे त्याच मन. सोड खेळ,कर अभ्यास सतत चाले हा ध्यास. सी इ टी,आय आय टी आज आहे नंबर वन. त्यासाठीच तर ओन्ली रन रन अँड रन.


Rate this content
Log in