Tukaram Biradar

Others

1  

Tukaram Biradar

Others

नवरा-नवरीची प्रथम भेट

नवरा-नवरीची प्रथम भेट

1 min
127


भारतीय संस्कृतीत लग्न जमवणे हे थोरामोठ्यांच्या संगतीने होतात,आशीर्वादानेच होतात.जेव्हा घरातील मोठ्या मंडळींची लग्नाला सहमती मिळते. या उपवरांना एकमेकांना भेटणे शक्य होते.लग्न ठरले असले तरीही आज भावी पतीची प्रथमच भेट होतेय. तेव्हा या उपवर कन्येचे लावणे साहजीकच.

     तिचा आनंदही गगनात न मावणारा.ती मोहरलीय.आयुष्यात प्रथमच भावी पतीची निवांत भेट होणार.हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार.पण पतीचे स्वागत कसे करावे. प्रथम भेटीत काय आणि कसे. बोलताना केव्हा थांबावे.त्याच्यासमोर कसे वागावे. तसे बोलायचे तर खूप काही आहे.पण मनातील भावना ओठांवर येतील का

     हृदयातील सर्वच भावना त्याच्यापर्यंत पोहचतील का.हा जन्मभराचा.आपल्या विषयी त्याचत्याचे मत चांगलेच रहावे याची दक्षता घेतेय म्हणूनच ती गोंधळली.कशी बरे खुलवावी त्याची. तो वारा कळी फुले का.तो चंद्र ते तारे त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटवली का. कळी कुणाची कोण खुलवतो.

     आज ती पुर्णपणे बावरलीय.प्रथमच त्याची अशी निवांत भेट होणार. त्यात ही घरची मंडळी घरातून गायब. बहूदा मुद्दमच. आता तिच्या पाठीशी घरची मंडळी कोणीही नाही. या प्रथम भेटीत कसे बरे स्वागत करुन त्याचे.


Rate this content
Log in