नविन्याचा ध्यास
नविन्याचा ध्यास
नाविन्याचा ध्यास
आजच्या या नवीन पिढीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. म्हणून जुने टाकून देता येत नाही. कायम' जुने ते सोने' असे म्हटले जाते.
जुन्या परंपरा, रूढी याचे विस्मरण न होता नवीन जे आहे ते आत्मसात करावे.
सृष्टी सुद्धा याला अपवाद नाही. सृष्टी पावसाळ्यात हिरवीगार होते. मानवी मनाला शांतता देते.उभारी देते.
सृष्टी सौंदर्याचे हे प्रतीक म्हणजे परंपराच नव्हे का? पावसाळ्यात फुलणे, मोहरणे तिचे हे रूप पाहण्यासाठी पर्यटक येतात. नयनांचे पारणे फेडले जाते. मन प्रफुल्लित होते.
तुम्ही म्हणाल हे तर काय चालूच असतं. यात नवीन काय?
पूर्वी माणसांकडे आजच्यासारखे स्मार्टफोन नव्हते. माणूस फक्त त्या ठिकाणी जायचा आणि सर्व जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपल्या डोळ्यात साठवायचा. पण हल्ली या स्मार्टफोनमुळे ते सौंदर्य आपल्या फोटोमध्ये कॅच करता येते. आणि हा नजारा इतका सुंदर असतो की त्याच्यावर चारोळी करता येते, कविता करता येते, लेख लिहिता येतो, काही लोक त्याचा पेंटिंग मध्ये वापर करतात. तसंच आपण काढलेल्या ह्या चित्रांचे प्रदर्शन सुद्धा भरवतात. या प्रदर्शनाद्वारे लोकांपर्यंत ही चित्रे पोहोचतात.
असे पोट्रेट पाहण्यासाठी खास गर्दी होते आणि त्याला तिकीट असतात त्यामुळे ज्याने कोणी हे प्रदर्शन भरवलेले आहे त्याला सुद्धा फायदा होतो. हे नाविन्यच नाही का.
म्हणजे काय आता सृष्टी सौंदर्य हे जुनंच आहे. दरवर्षी दरवर्षी पाऊस पडतो,दरवर्षी सृष्टी ही सौंदर्यांन नटलेली राहतेच पण याला कैद करणारे हे जे क्षण आहेत फोटोचे त्यातूनही कमाई केली जाते हे नाविन्य आहे. कधी कधी सृष्टी ही रौद्ररूप धारण करते याचेही क्षण टिपले जातात. व्हिडिओ निर्मिती होते. ज्यांना कोणाला हे रूप पाहता येत नाही त्यांना व्हिडिओद्वारे माहित होते. स्मार्टफोन, स्मार्ट काम, आणि स्मार्ट व्हिडिओ असे एकंदरीत म्हणावे लागेल.
एकंदर काय तर हल्ली प्रत्येकाजवळ हा नवीन स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोन मध्ये फोटोव्हिडिओ काढण्याचा फार नाद सर्व लहान थोरांना लागलेला आहे. म्हणजेच नाविन्याचा ध्यास लागलेला आहे.
असा नाविनतेचा ध्यास आम्हाला वृद्धांनाही जडलेला आहे. या स्मार्टफोनचा.
आज वय वर्ष 1 ते अगदी 85 पर्यंत सर्वांना स्मार्टफोन हाताळता येत आहे.
ज्यांच्या हातात नुकतेच हे फोन आलेले आहेत ते नाविन्याचा ध्यास घेऊन मला हे आलंच पाहिजे.मला या फोन मधलं का येत नाही. मला शिकता आलं पाहिजे याचा ध्यास घेतात आणि नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात.
हा स्मार्टफोन म्हणजे ना खरं स्मार्ट आहे. याच्यामध्ये अनेक ॲप आहेत. बऱ्याचश्या गोष्टी सहज सुलभतेने मिळतात.
माझ्याकडे जवळ जवळ 35 वर्षांपासून काही पुस्तक खूप जुनी अशी मी ठेवली होती.
माझ्या स्वर्गातल्या मुलांचे काही छान साहित्य मी अजून पर्यंत जपून ठेवले होते. ही मुलं डॉक्टर इंजिनियर वकील काहींचे मोठे मोठे ऑफिस आहेत काहींच्या चहाच्या फ्रेंचाइज आहेत.पण माझ्याकडे त्यांचे लहानपणाचे प्रोजेक्ट अजूनही होते. पूर्वीपासूनच मला उपक्रमांची खूप हाऊस होती. स्वतःच्या खर्चातून मुलांना वस्तू देऊन त्यांच्याकडून उपक्रम बनवून घेणे हे माझी खासियत. आणि पुन्हा पुन्हा त्या मुलांचे कौतुक करण्यासाठी वस्तू हाताळणे हे माझे काम.
पण मध्ये दोन वर्षांपूर्वी माळ्यावरचं जरा स्वच्छता करण्यासाठी काढला असताना माझी कामवाली बाई म्हणाले बाई आपण दरवर्षी हे काढतो आणि परत ठेवतोय ते पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी येत मी पाहते पण हे किती वर्षे तुम्ही जपणार घरात जागा वाटते या वस्तूंमुळे. तसं मला खूप वाईट वाटलं. पण तिने अजून एक सांगितले की या वस्तू ठेवून तुम्ही काय करणार आता ह्या जीर्ण होत आलेले आहेत हा कागद फाटत चाललेला आहे तर हे तुम्ही आता मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी. मी तिचे म्हणणे ऐकले आणि नाविन्याचा इतिहास घेत त्यातील काही वस्तू सॉर्टिंग केल्या आणि अगदी बोटावर मोजणे इतक्या वस्तू परत ठेवल्याच माझ्याकडे.
तसेच खूप जुनी पुस्तकं कागद जीर्ण होत आलेले होते पण ते मनात न कुठे रद्दीला द्यावेत असे वाटतच नव्हते शेवटी माझी बाई मला म्हणाले की मॅडम तुम्ही एवढ्या हुशार आता सगळं नेट सर्च करताय सगळं तुम्हाला मिळतंय तर ही पुस्तकं सुद्धा तिथे मिळतात तर कृपा करून हे आपल्या घरातनं रद्दी बाजूला काढा. मी पण जरा विचार केला पण त्यावेळी माझ्याकडे नेमकं रद्दी असणाऱ्या पुस्तकांची किंमत म्हणजे दोन तीन वाचनालयांमध्ये हे पुस्तक हवी होती आणि मी काहीही विचार न करता हे पुस्तक त्या लोकांना मी देऊन टाकली. मला खूप आनंद झाला की माझा हा जुन्या पुस्तकांचा ठेवा खेडेगावातल्या वाचनालयांमध्ये ठेवला गेला.
आता मला काही लागले की मी नेट सर्च करते आणि मस्त ते डाऊनलोड करते किंवा स्क्रीन शॉट काढते आणि मग माझ्या लेखनात उतरवते. असा हा नाविन्याचा ध्यास आहे.
नवीन घेताना जुन्याचा विसर पडू देऊ नये हेच मला सांगायचे आहे.
अगदी साड्या, कपडे यात सुद्धा बघा फिरून, फिरून जुनी फॅशन परत येते नवीन पिढी त्याला आत्मसात करतात. एकंदर काय तर जुन्या नव्याचा संगम हा आपल्याला जीवनामध्ये करावाच लागतो आणि तो सगळीकडे पहायलाही मिळतो.
संगम नव्या जुन्याचा
जीवनात कायम राखावा
आनंद येईन या जीवना
जीवन सुख दुःख मिळावा...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116
