नम्र ज्ञानी
नम्र ज्ञानी
माणसाने अलीकडे खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या आधारावर खुप छान प्रगती केली आहे. माणूस खुप ज्ञानी झाला आहे. माणूस अनेक पुस्तके वाचून प्रगती केली आहे. पण आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय लागते. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खुपच निराळ आहे. या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच या पुस्तकाचे वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नसते. पण आयुष्याचं पुस्तक वाचणारा
माणूस ओळखायचा कसा? , कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो. तेेव्हा ओळखायचा. .
'मी अडाणी माणूस आहे' या सारख्या वाक्यातून अशा माणसांंची विद्वत्ता बाहेर पडते.नमृतेचा पोशाख घालून चातुर्य जेेव्हा प्रकट व्हायला लागते, तेव्हा या माणसांंची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसच निराळी असतात. त्यांच्या चालण्यात, बोलण्यात फार नम्रपणा असतो. यांचे वागणे फारच चांगले असते.
चार पुस्तकं शिकलेल्या माणसाला आपली हुशारी, आपली विद्वत्ता, ज्ञान, रुखवतासारखे कधी मांडून ठेवू असं होतं. आणि ही ज्ञानी माणसं असतात कसे? पाकीटावर स्वत:च नाव न घालता आहेेर करणाऱ्या आप्तासारखे असतात.
