नक्की चुकता कुणाचं ?
नक्की चुकता कुणाचं ?
बाहेरच्या विश्वात आणि कस्टमर बरोबर मधाळ आवाजात बोलणारा, स्वत:च्या आईबाबांना मधमाशी सारखी करून का बोलतो? याचे उत्तर काॅम्पुटर सुद्धा देत नाही.
आपल्या काही चुकलय,की पिढी बदललेली आहे. ? चांगले आणि वाईट याला वैयक्तिक संदर्भ आहे की हे सामाजिक संकेत आहेत? का या चालीरीतींना काळातील स्वत:ची मूल्य आहेत? वाणी मधूर असावी यात निथळ माधूर्याचं जतन असावं. पण या पिढी जवळ हिशोब आहे म्हणूनच ही पिढी चार भिंती बाहेर मधूर बोलते. आणि ज्यांच्या वाचून असणार नाही त्याच्यावर वार करते.
एखाद्याच्या हातात पहिला पगार पडला म्हणजे आईबाबांना गरज संपली आणि घरात बायकोच्या आगमन झाले म्हणजे आईबाबांना अडथळा. कित्येक घरात आईबाबा यांची सेवा होत नाही, उलट त्यांना त्रास केला जातो., वेळेवर जेवण मिळते नाही, सारखी छेडछाड केली जाते. त्यांच्याकडे पहायला कुणाला वेळच नाही. आईबाबा हे आईबाबाच नसून ते आपल्या साठी देव आहेत. या देवाची दररोज पुजा केली पाहिजे. पुंडलिकाप्रमाणे आईबाबांचे पाय चेपावेत.असली अपेक्षा कोणी करणार नाही या काळात तरी. फक्त मनमोकळे बोलावे.
आईबाबा यांची काहीही अपेक्षा नसते, फक्त वेळेवर अंघोळ, वेळेवर जेवण बस्स!! एवढेच. बाकी काही नाही. आणि तोंडाने चार शब्द चांगले बोलावे. दुसरे काही नाही. एवढे करायला आपल्या कडे वेळ नाही. मग काय करणार या जन्मात येऊन. दगडाच्या देवाची पूजा. चालत्या-बोलत्या देवाची नाही का करायची पूजा. इतर आपले नक्की चुकतय आपले.
