निसर्ग
निसर्ग
"निसर्गाने दिलेले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी हे ग दि माडगूळकरांनी म्हणून ठेवलेल आहे.
निसर्ग आपल्याला उदार हस्ताने सारं काही देत असतो, पण आपली झोळी फाटकी असते.
निसर्ग म्हणजे काय सारी सृष्टी , ब्रह्मांड,या निसर्गामध्ये येत. पृथ्वी, आप ,तेज ,वायु आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनवलेली सृष्टी म्हणजेच निसर्ग. निसर्गाची देखील वेगवेगळी रूपे आहेत. सौम्य रूप, मनाला सुखावणारेआल्हाद दायक , कधी रौद्ररूप, कधी भीषण रुप. आपण हिमालयात फिरायला जातो, फिरताना बर्फाचे मुगुट घातलेले डोंगर पाहताना अगदी नेत्राचे पारणे फिटते .परंतु जेव्हा बर्फाचे कडे कोसळू लागतात तेव्हा मात्र जीवाचा थरकाप होतो तेच निसर्गाचे रौद्र रूप. आपण एखाद्या पावसाळी पिकनिकला गेलो ,धबधब्याखाली भिजतोय, मजा घेतोय, तोपर्यंत ठीक. पण जर तिथे जोराचा पाऊस पडला, वरून दगड पडले तर ते निसर्गाचं भीषण रूप.
माणसाने कितीही प्रगती केली, मोठेमोठे शोध लावले, तरी निसर्गापुढे माणूस खुजा आहे.
आपल्या भारतात तर निसर्गाने नटलेली विविध ठिकाणी आहेत बर्फाचे डोंगर ,समुद्र, घनदाट जंगल, वाळवंट सारे काही आपल्याकडे आहे
भारताचे वर्णन करताना एका कवीने म्हटले आहे "काही खडे पर्वत बर्फीले , तो फिर कही है रेत के टिले
सागर कही हिलोरे लेता नदी की धारा
मै बंजारा लेक इकतारा
घुमा भारत सारा"
गेल्याच वर्षी सिक्कीमला गेले होते येथे अप्रतिम निसर्ग असंख्य धबधबे डोंगर-दऱ्या झाडे जंगल एका ठिकाणी तर अख्खाच्या अख्खा डोंगर घसरलेला पसरलेला व साधारण चार-पाच किलोमीटरच्या अंतरात त्याचे दगडधोंडे पसरलेले होते ला खूप काही छान आहे गावोगावी होम स्टे अख्खे राज्य डोंगरात वसल्यामुळे पर्यटन हा प्रमुख व्यवसाय पण तेथील लोक निसर्गाला ओरबाडत नाहीत तर त्याच्या हातात हात घालून स्वतःची प्रगती देखील करतात.
साऱ्या विश्वाला नियंत्रित करणारी अशी एक शक्ती आहे तुम्ही तिला परमेश्वर म्हणा
नाही तर निसर्ग म्हणा इथली जुनी आदिम संस्कृती निसर्गाची पूजक आहे त्यानंतर अगदी पुराणाचे दाखले दिले तरी द्वापारयुगात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा केली त्याच्या नावाची गंमत बघा गोवर्धन म्हणजे गाईंचे संवर्धन करणारा अर्थात गाईंना चारा देणारा त्याकाळी श्रीमंतीही तुमच्या दारात किती गोधन आहे त्यावर मोजली जायची राजे-महाराजे दान देताना देखील दुभती गाय देत असत .त्या गाईंचे पालन पोषण करणारा पर्वत तो आपला देव असे भगवान कृष्णाने सांगितले. हिंदू संस्कृती आणि सणवार हेदेखील संपूर्णपणे निसर्गाशी तादात्म्य पावलेले आहेत .हिंदू धर्मात सर्व प्राणीमात्रांना देव मानलेल्या आहेत गाय, बैल, रेडा ,साप, नाग घुबड, हत्ती, कासव इतकेच काय वाघ आणि सिंह देखील देवाचे वाहन बनवलेले आहे. त्यानिमित्ताने या प्राण्यांचे संवर्धन होईल हा येतो हा हेतू पण नंतर माणसाला इतकी हाव सुटली ,की साऱ्या पृथ्वीवर त्याला एकट्यालाच रहायचंय. त्याने सर्व प्राणिमात्रांना आपल्या बुद्धीच्या जोरावर गुलाम केले आहे .मोठ्या मोठ्या मशीन चा शोध लावून जंगल तोड करणे ,डोंगर फोडणे ,नद्यांचे प्रवाह बदलणे, पाण्याचा अमर्याद उपसा करणे इतर सजीवांची क्रूरपणे हत्या करणे समुद्र बुजव खाडी बुजव त्यात भराव टाकून झोपड्या भान चाळी बांध हे सारे चालले चालले हे जर वेळेत थांबले नाही ही तर मनुष्याता र्हास
स निश्चित आहे. स्टोरी आली म्हणजे मोठ्या प्रमाणावर कॉंक्रिटीकरण केल्याने जमिनीत पाणी जिरत नाही व मोठे मोठे महापूर येतात सारे जगत जनजीवन उध्वस्त करतात जमिनीची धूप होते प्रचंड प्रमाणात जंगल तोड आणि डोंगर फोड केल्याने एक तर अतिवृष्टी नाहीतर कोरडा दुष्काळ पडतो अन्नधान्य उत्पन्न कमी होते या आपल्याच वागणुकीचा परिणाम देशाच्या ,जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो मंदी येते, शेतकरी आत्महत्या करतात, कामगार बेकार होतात, व सारा देश बरबाद होतो माणसा आता तरी जागा हो निसर्गाचे संवर्धन कर .
संत तुकोबारायांनी म्हटलेले आहे ना
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी हे सुस्वरे आळविती"