निसर्ग
निसर्ग
जीवनात ज्याला सकारात्मक दृष्टी लाभली तो भाग्यवानच मग त्याला हे जग किती सुंदर आहे हे जाणवते. बालकाचे मन तर अतिशय पापभीरू..... मुलायम..... निर्मळ.
या संस्कारक्षम वयातच काय रुजवायचे हे ठरवावे लागते. जेव्हा चांगले साहित्य वाचनात येते तेव्हा नकळत निसर्गाविषयी, समाजाविषयी व देशाविषयी कृतज्ञता भाव निर्माण होतो. कोणताही भेदभाव न ठेवता समानता पाळत सुर्य, चंद्र, झाडे ,वेली वागतात.
त्या सुंदर चांदण्या मनमोहून टाकतात. त्या वेलीवरच्या सुंदर कोमल फुलासारखे ही बालके. या अवर्णनीय सुंदर निसर्गाची निर्मिती करणारा तो देवही तसाच छान सुंदर उदार मनाचा नक्कीचा असावा.
निसर्गाच्या सानिध्यात सर्वकाही माहिती दिली आहे या सानिध्यात गेल्यावर आपल्याला निसर्गाचा सुंदर देखावा पहायला मिळते. निसर्ग खूप सुंदर आहे. हे पाहिल्यावरच कळते. निसर्गाची अगाध महामार्ग आहे. निसर्गाची ठेवण आपण जपली पाहिजे............
