निसर्ग पुष्प
निसर्ग पुष्प
निसर्गात प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की सारे विश्व आता याबाबत खडबडून जागे झाले आहे.त्यामुळे दरवर्षी ‘वसुंधरा दिन’ पाळून ‘वसुंधरा बचाव’ हा संदेश सर्वांना दिला जातो.वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचाच विसर या वसुंधरापुत्रांना पडत आहे आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढवत आहेत, प्रदूषण हे मानवनिर्मित आहे;पण या मानवाला त्याची जाणीवच नाही.जंगलतोड,पावसाचे प्रमाण कमी
जंगलतोड,पावसाचे प्रमाण कमी,प्रदूषणाने केला घात, सर्वत्र झाली वाताहात.माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरू करतो,पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का?याचा विचार तो करीत नाही.उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगलतोड केली. त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. जमिनीची धूप वाढली.माणसाची कृती प्रदूषणाला कारण होत आहे,हे लक्षात घ्या.माणसाने आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरू केले,अनेक प्रकारची वाहने शोधून काढली.त्यामुळे वायुप्रदूषण वाढले.माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा.दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात.माणसे, पशु,पक्षी मृत्युमुखी पडतात.कित्येक दुर्मीळ वनस्पती नष्ट होतात.गिरण्या-कारखान्यांतील दूषित पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते.अशा दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला दूषित करताना माणसाला मात्र थोडी खंत वाटत नाही.वायुप्रदूषण,जल प्रदूषण,ध्वनिप्रदूषण,प्लास्टिकचा कचरा,धान्यावर औषधे फवारणे इत्यादी.माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटले. अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणाचा उपयोग सुरू केला;पण त्यामुळे घनकचरा वाढू लागला.प्लास्टिक कुजत नसल्यामुळे हा कचरा नष्ट होऊ शकत नाही.त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतातील पिकांवर कीड पडू नये, म्हणून ओषधे फवारली जातात. अशा या ओषधांमुळे वातावरण दूषित होतेच; पण अशा अन्नधान्यांचा माणसाच्या प्रकृतीवर ही अनिष्ट परिणाम होतो.
