निसर्ग पुष्प
निसर्ग पुष्प
निसर्गाची सर्वात महत्वाची समस्या ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढचे दुसरे नाव आहे.ग्लोबल वार्मिंगमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या ग्रहाभोवती उष्णतेला अडथळा आणणारे प्रदूषण.पृथ्वीमधील उष्णता प्रदुषणाच्या थरामुळे बाहेर न जाता पृथ्वीमध्येच अडकली जाते व त्यामुळे पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मानव जीवाश्म इंधन जाळतात,वाहने हानिकारक वायू उत्सर्जित करतात, भयानक दराने जंगले जाळली जातात ही सर्व जागतिक तापमान वाढीसाठी प्रमुख कारणे आहेत.
एकदा त्यांचा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश झाला की ते जगभरात पसरते आणि पुढचे ५०-१०० वर्ष वातावरणात अडकून राहतात.सर्वात वाईट भाग म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड सारखा हानिकारक वायू चिंताजनक दराने वाढत आहेत.ह्याचा दुष्परिणाम पुढच्या पिढीला मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.प्रदूषणाला आळा घालण्यासाठी (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल)भारत सरकारने एनजीटी (NGT) स्थापन केले आहे.२०१० पासून, एनजीटीच्या आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास अनेक उद्योगांवर भारी दंड आकारला आहे.यामुळे अनेक प्रदूषित तलावांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत झाली.तसेच गुजरात मधील कोळसा आधारित उद्योग बंद करण्याचे आदेश दिले ज्यामुळे वायू प्रदूषण होते.गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार पर्यायी उर्जा स्त्रोतांकडे वळण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे.तामिळनाडू राज्यातील रहिवाशांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम ठेवणे अनिवार्य आहे.वैकल्पिक उर्जेचे इतर स्त्रोत म्हणजे जैवइंधन,पवन ऊर्जा, जलविद्युत इ.चा वापर करणे गरजेचे आहे. भारत सरकारने जाहीर केले होते की १ एप्रिल २०२० पासून देश बीएस -६ (भारत टप्पा सहावा) इंधन वापरण्याच्या दिशेने जाईल.एकदा हा नियम अस्तित्त्वात आला की सल्फरच्या वाहनांच्या उत्सर्जनात ५०% पेक्षा कमी घट होईल.त्यात डिझेल कार मधून नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन ७०% आणि पेट्रोल कारमध्ये २५% कमी होईल.त्याचप्रमाणे कारमधील उत्सर्जन ८०% ने कमी होईल.वायू प्रदूषण रोखण्यासाठी लोक आता एअर प्युरिफायर्स वापरत आहेत.एअर प्युरिफायर्स हवेत असलेले कण पदार्थ कमी करतात,हानिकारक जीवाणू काढून टाकतात आणि हवेची गुणवत्ता बर्याच प्रमाणात सुधारतात.ही काळाची गरज आहे.
