STORYMIRROR

Pratima Kale

Others

2  

Pratima Kale

Others

निसर्ग पुष्प

निसर्ग पुष्प

1 min
37

निसर्ग म्हणजेच त्याच्या सभोवतालचे पर्यावरण अन् त्याचा ऱ्हास बघून आणि मानवाला पर्यावरणाविषयी जागृत करण्यासाठी जगाने २२ एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली आणि संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक पर्यावरण दिवस ५ जून ला साजरा केला जातो.मानवाची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मानवनिर्मित कचराही वाढत आहे. त्यामध्ये नष्ट न होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा संपूर्ण जगामध्ये संकट निर्माण करत आहे. आता जगभरात प्लॅस्टिकची कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे.अशाप्रकारे माणूसच मानवाचा शत्रू ठरत आहे त्यामुळे मानवाला आता त्याच्या या वागण्याचा विरुद्ध लढावे लागत आहे.तसेचआजकाल पर्यावरण संवर्धनाची म्हणजेच पर्यावरणाला जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने अनेक कायदे नियम देखील केली आहे.सार्वजनिक पातळीवर सर्वीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवताना दिसत आहे.आपल्याला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल योग्य ती जबाबदारी पार पाडत काढणे कोरडा कचरा ओला कचरा अशी विभागणी केली पाहिजे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा आपल्या प्लास्टिकला पर्यायी कागदी पिशव्यांचा उपयोग करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे. सामाजिक ठिकाणी पर्यावरण जागृती बद्दल कार्यक्रम राबवणे.एवढ्या लहान साहान पण फार महत्त्वाच्या गोष्टी करून आपण आपले पर्यावरण,आपला निसर्ग स्वच्छ ठेवू शकतो,त्याला वाचवू शकतो.


Rate this content
Log in