STORYMIRROR

Pratima Kale

Others

2  

Pratima Kale

Others

निसर्ग पुष्प क्रमांक ८

निसर्ग पुष्प क्रमांक ८

1 min
60

निसर्ग म्हणजेच पर्यावरणाचे प्रदूषण जल,वायू,ध्वनी मुळे होत असते.जलप्रदूषण हे वाढत्या औद्योगिकरणामुळे

पाण्याच्या साठ्यामध्ये कचरा आणि निरुपयोगी पदार्थ टाकणे. पाण्याचा योग्य वापर न करणे. रासायनिक कचरा पाण्यात सोडणे रासायनिक कचरा आणि कारखान्यातून होणारे दूषित पाण्याचे योग्य विल्हेवाट न लावणे यामुळे घडते.

तर, वायुप्रदुषण हे फटाके फोडणे, कारखान्यातील दूषित वायू हवेत सोडणे.टाकाऊ पदार्थ जाळणे.यासाठी आपण पुढील उपाययोजना करू शकतो की, कारखान्यातील दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे,टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे.फटाक्यांचा मर्यादित वापर करावा, लाऊडस्पीकरचा वापर आटोक्यात आणणे.

   पर्यावरण समस्या टाळण्यासाठी,कचरा काच,प्लास्टिक,धातू आणि बॅटरी यांना कचऱ्यात वेगवेगळे टाकावे. शक्य असेल तितके टाकाऊ वस्तूंपासून पूर्णवापर करावा.झाडे लावा झाडे जगवा, हा उपक्रम राबविले पाहीले.जंगलतोड आटोक्यात आणण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.आपल्याकडून नैसर्गिक साधनसंपत्ती योग्य वापर होईल,याची खबरदारी घ्यावी.

सौरऊर्जावर आधारीत साधनांचा उपयोग करावा.पेट्रोल, डिझेल सारखे इंधन जपून वापरली पाहिजे.अनधिकृत बांधकामांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

पर्यावरण समतोल काळाची गरज आहे, यासाठी विशेष उपक्रम राबवणे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष खुपचं उपयुक्त आहेत. जर आपल्याला पर्यावरण समतोल राखायचा असेल तर, वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. निसर्गाशी मैत्री करूया,जीवन अधिक सुंदर करूया. वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदुषण.निसर्ग माझी माता, मीच तिचा रक्षणकर्ता.पर्यावरण वाचेल तर जग वाचेल.झाडे लावा, झाडे जगवा.भविष्य वाचवा, जीवन फुलवा.


Rate this content
Log in