Pratima Kale

Others

3  

Pratima Kale

Others

निसर्ग पुष्प क्रमांक ३

निसर्ग पुष्प क्रमांक ३

2 mins
183


घन बरसत आले..ये रे घना,येरे घना,न्हाऊ घाल,माझ्या मना....ही आरती प्रभूंची कविता सतत आपल्याला आठवते.जून महिना सुरू झाला की पावसाची आपण वाट पाहत असतो. पावसावरच आपले आयुष्य अवलंबून असते. पावसाची अनेक रूपे कवींनी आपल्या कवितेतून मांडली आहेत. पाऊस हसला की आपण हसतो,पाऊस रुसला की आपण रुसतो, श्रीराम गोविंद गव्हाणे यांची एक कविता वाचल्याचे स्मरते. कवितेत ते म्हणतात,पाऊस रुसतो तेव्हा आटून जातात माळाच्या पोटातले झरे

अन् आटतात तळवणीतील डोबकाडही

उजाड माळावरचं खरुट गवत खुरडीत फिरतात भुकेच्या आकांताने आमची सरभैर ढोरं पाऊस काही येत नाही,रुसवा काही जात नाही,तेव्हा घराघरातून जात्याच्या पाळूला घास भरवत,गातात मायमाउल्या ओव्या,पावसासाठी काकुळतीनं..पड पड रे पावसा,कशी तुला नाही कीव....पाऊस रुसू नये आपल्यावर म्हणून आपण सजग राहिले पाहिजे. निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो. निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे. निसर्गाच्या -हासाला सुरुवात झाली की,आपल्याही -हासाला सुरुवात होते. ‘माणूस आणि निसर्ग’ जगला पाहिजे. पाऊस, झाड, पक्षी, समुद्र, आकाश यांची ओढ मनाला वाटते.आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निर्माण झालेला हा नात्याचा प्रवास विलक्षण आहे.तो समजून घेऊन हा नातेसंबंध उत्कट होणे गरजेचे आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही.हाच या संपादनाचा मुख्य गाभा आहे.आपलं जीवन गतिमान बनत चाललेलं आहे. जमिनीवरून दिसणा-या चंद्रावर आपण आपल्या पावलांचे ठसे उमटवले. माणसाच्या बुद्धीची गती अगाध आहे.तिचा अंदाज घेणे कठीण आहे. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक भौतिक प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपल्या हातात ओंजळभर बिया हव्यात. त्या रुजत गेल्या की सावल्यांचे रूप आपल्या अवतीभोवती असेल.आपल्या रूपाइतकंच ते रूप महत्त्वाचं आहे. ते रूप ओळखण्याची गरज आहे.


Rate this content
Log in