Pratima Kale

Others

2  

Pratima Kale

Others

निसर्ग पुष्प - 7

निसर्ग पुष्प - 7

1 min
822


निसर्ग म्हणजेच आपले पर्यावरण हे सर्व सजीव सृष्टीचे घर म्हणून ओळखले जाते.यात निर्जिव घटकांचा देखील समावेश होतो.सर्व सजीव ज्यामधे प्राणी, पक्षी आणि इतर घटक यांना स्वतःची मूलभूत गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहवे लागते.त्यामुळे आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरली पाहिजे.नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याकारणाने, पर्यावरणचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.परिणामी सजीव सृष्टीवर घातक परिणाम होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे.हे संसाधन दिवसेंदिवस कमी होत आहे.याचे कारण सतत वाढत चाललेली लोकसंख्या,त्यामुळे वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि त्यात मानवी जीवन सुखमय व्हावे यासाठीचे प्रयोग दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.या सर्व कारणांनी नैसर्गिक साधनांचा मर्यादेबाहेर वापर होत आहे त्यामुळे जल,वायू,ध्वनी, अंतराळ आणि माती यांचे इत्यादींचे प्रदूषण होत आहे.यामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांनी यांनी जगभर गंभीर स्वरूप धारण केले आहे.त्यामुळे सजीवांचे अस्तित्व संपत चालले आहे, त्यात मानवी प्रजातीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.यासाठी आपण पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने एक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनणे गरजेचे आहे.याची सवय लहानपापासूनच व्हावी म्हणून सर्व शालेय स्तरावर पर्यावर हा विषय अभ्यासला जात आहे.


Rate this content
Log in