निरोप
निरोप
1 min
453
अलक
अनाथाश्रमात आला तेव्हा तो अगदी तान्हुला आणि भारीच गोजिरवाणा होता. या चार वर्षात तो सर्वांचा खूप लाडका झाला होता. पण आज एका छान कुंटूबात मुलगा म्हणून जाणार होता. त्याला हक्काचे आई - बाबा मिळणार होते.
आणि तो क्षण आला. आज आईच्या कुशीत जाताच तो खूप खुश झाला. पण त्याला निरोप देतांना अनाथाश्रमातील सर्वांच्या डोळ्यावाटे आनंद आणि दुःख मिश्रित अनोखे अश्रू पाझरू लागले.
