STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

नातलग

नातलग

3 mins
15

नातलग

 "आपल्याला गोत्यात आणतात ते नातलग." असे मी डीएडला असताना एक मॅडम म्हणायच्या. त्यांनी हे वाक्य वापरलं होतं पण ते माझ्या कायम स्मरणात राहिलेल आहे. हे तंतोतंत खरे आहे. आपल्याच नात्यागोत्यातली काही माणसं असतात ते आपले पाय खेचत असतात. आपण जरा जरी उंचीवर जाण्याचा प्रयत्न केला की त्यांना ते सहन होत नाही. एक जळाऊ प्रवृत्ती असते माझ्यापेक्षा कोणी पुढे जायला नको. असे यांना वाटत असते. आणि ह्या उक्तीचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. ठराविक,बोटावर मोजण्या इतके नातलग असे असतात की त्यांना आपले कौतुक करायला आवडते आणि ते तोंड म्हणून कौतुक करतात. आपले पाय खेचण्याच्या मागेही लागत नाहीत. नातलगांपैकी आता दहा टक्के लोक असे असतील की आपण पुढे जाण्यामुळे ते खुश होतात. आपल्याला शाब्बासकी देतात फोन करून चौकशी करतात. तोंड भरून कौतुकही करतात. पण 90% नातलग आहेत ना ते जळावू प्रवृत्तीचे असतात. आपण पुढे गेलेले कोणाला रुचत नाही, पचत नाही, बघवत नाही असे म्हणूया. त्यांना असे वाटते की कायम यांनी आहे त्याच परिस्थितीत राहियला हवे. पुढे येता कामा नये. पण अशा नातलगांना पण जरा लांब ठेवले तर! आपण त्यांना लांब ठेवू शकत नाही पण त्यांचा विचारही करायचा नाही. ज्यांचा विचार मनात आणून आपल्याला त्रास होतो अशा व्यक्तींचा मनात का विचार आणयचा? आपणच आपल्या मनाला समजावलं. काही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना मन हलके केले असता आपल्यालाही त्यांनी असाच सल्ला दिला. आपले मन जिथे रमल तिथे आपण रमायचे. आता आपले दिवस राहिले किती? जग एवढ सुंदर आहे या जगाची निर्मिती करणारा जो विधाता आहे त्या विधात्याची कलाकृती नजरेने पाहून घेऊया. मनातच साठवूया. सर्वांशी चांगलेच वागूया. कोणी कसा का वगेना आपण मात्र त्याच्याशी चांगलं वागावं. म्हणजे आपल्याला समोरच्या माणसाचा त्रास होत नाही. मग तो नातेवाईक असू दे,मित्रपरिवार असू दे, अथवा कोणी आपल्याबरोबरचा साहित्यिक असू दे. आपण कोणाचेही बोलणे मनावर घ्यायचे नाही. आपल्या मनाला जे चांगले पटतात ते विचार घ्यायचे. आपल्या आचरणात आणायचे. या ठिकाणी जरी आपले नातेवाईक यांचे विचार चांगले असेल तर ते सुद्धा पण आत्मसात करायचे. त्या नातेवाईकांनी कितीही आपल्याला वाईट म्हणूदे, जळावू प्रवृत्तीने पाहू देत,कौतुक नको करू देत अशा माणसांपासून चार हात लांब तरी राहियचे नाही जमले तरी त्यांना मनातन खोडून टाकायचं. हल्ली व्हाट्सअप वर डिलीट हा शब्द आहे. आपल्याला न आवडणारे मेसेज किंवा खूप झालेले मेसेज आपण डिलीट करतो. त्याप्रमाणे या नातलगांना डिलीट करता तर येणार नाही पण मनातून तर डिलीट करता येईल काही वेळापुरते तरी. काही वेळाने पुन्हा आपण त्यांच्यासमोर जाणारच आहोत कारण ते नातलग आहेत नातलगांपासून आपल्याला पळवाटा नाहीत. सणवार या समारंभासाठी आपल्याला एकत्र यावच लागतो. म्हणून म्हणते मित्रांनो नातलगांशी प्रेमानेच वागा, चांगलं वागा त्यांनी कितीही त्रास दिला,कितीही आपले पाय खेचायचे प्रयत्न केला तरी वरचा विधाता आहे जो आपल्या नावावर जे लिहिलेला आहे नशिबाने आणि जे आपल्या हाताच्या मुठीमध्ये आहे,आपण जे कर्तुत्व करत आहोत त्या कर्तुत्वाने आपण पुढे जाणार आहोत. कोणाचा कितीही काहीही दुस्वास असेल तरीसुद्धा आपण पुढे जाणार आहोत हे लक्षात ठेवून आपण आपले पुढचे पाऊल उचलावे. माणूस म्हणून जन्माला आलेला आहोत माणसांना माणसासारखं वागावं. एकमेकांचा दुस्वास करू नये. आपुलकीने वागाव. वागण्या, बोलण्यात नम्रता असावी. आदर असावा. तिथे आपल्या समाजाचे भान ठेवून आपण बोललं पाहिजे. आपण एकमेकांशी बोलताना वयाचं भान ठेवावं. कोणाच्याही बोलण्याने आपली मानसिकता ढळू देऊ नये. सर्वांशीच आपुलकीन वागावं. थोरामोठ्यांचा आदर करावा. लहानांना देखील समजून घ्यावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्वांनाच मानसिक त्रास होतो. त्यात तुम्ही आम्ही वेगळे नाहीच. चला तर मग कोणी कसे वागले तरी आपण आपलं चांगलं वागून आपली प्रतिमा स्वच्छ ठेवावी. वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा -पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in