Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

नाती जपताना

नाती जपताना

3 mins
307


कोणतेही नाते जपण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आपण जन्माला आल्या बरोबरच सोबत अनेक नाती जन्माला घेऊनच येतो. त्यामध्ये आई बाबा, आजी आजोबा, आत्या, मावश्या, काका, मामा, बहिण, भाऊ ही सारी नाती असतात. जशी जशी आपली समज वाढत जाते तशी तशी ही नाती आपल्याला समजावली जातात. आपल्याकडून ती समजली जातात. पुढे लग्न झाल्यानंतर अजून सासरची नाती वेगळीच असतात. सासू, सासरे, दीर जावा,नणंद, नंदावा आणि अशी अनेक नाती असतात. आपले शेजारी-पाजारी, ओळखीचे, पाळखीचे कामावरील लोक, आपले सहकारी, बस मधले सहप्रवासी, ट्रेनमधले सहप्रवासी, ऑफिस मधील बॉस अशा प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या नात्याने आपण जोडले जातो.

स्त्रियांना आपल्या माहेरच्या नात्याचा खूप अभिमान देखील असतो आणि त्या लग्नाच्या नंतर कित्येक वर्ष देखील आपल्या माहेरच्या नात्यांबद्दल बोलत असतात आपल्या कित्येक गाण्यांनी ही नाती समृद्ध केलेली आहेत.

"सावळा बंधूराया, साजिरी वहिनी बाई,

गोजिरी शिरपा हंसा माहेरी माज्या हाई.

हा नात्यांचा गुंता मोठा वाईट असतो सुटता सुटत नाही आणि तोडता येत नाही आणि लग्नानंतरची दोन विशेष नाती असतात. एक असतो आपला जोडीदार, ज्याच्याशी आपले रक्ताचे नाते नसते. परंतु सगळ्यात जवळचे नाते तेच असते, जे पुढे पन्नास- पन्नास, साठ- साठ वर्ष किंवा एकाच्या अंतापर्यंत निभावले जाते. त्या नात्यासारखे जगात कोणतेच नाते नाही. ज्यामध्ये देवाण-घेवाण दोन्ही असते, कोणी कोणाकडून अपेक्षा न करता देखील  ती नाती निभावली जातात. मनातले न सांगता देखील ते ओळखलं जातं .

अजून एक नातं असतं आपल्या मुलांचं, म्हणतात या नात्याला देखील जगामध्ये तोड नाही. ज्यांना आपण जन्माला घालून त्यांचं सारं बालपण, तरुणपण, मोठेपण, आपण घडवतो, बघतो त्यांच्या घडण्याला पण साक्षी असतो, आपल्या आकांक्षा इच्छा देखील पूर्ण करणे आपण त्यांच्यामध्ये पाहतो. कधीकधी आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर ती लादतो, पण ते न तुटणार, न संपणार ,असं नात असत. बाकीची सारी नाती संपली, तरी पती-पत्नी मुले आणि आई वडील हे नातं काही कधी संपुष्टात येत नाही.

अजून एक महत्वाचं नातं विसरलं ते म्हणजे सासू आणि सून तिला कितीही लेक मानलं तरी ती लेक होत नाही. तिने कितीही आई म्हटलं तरी ती सासू आई होत नाही. असं ते नातं धरल तर चावतय सोडल तर पळतय दोघींना देखील एकमेकी बरोबर  निभवाव लागतं. असं ते नातं. कारण त्यांना माहित असतं आपणाला एकमेकी बरोबर दिवस काढायचे आहेत.

आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय.

आपुल्या त्या लेकासाठी

सून म्हणावी रतन (रत्न)

आपुल्या त्या सोन्यासाठी

चिंधी करावी जतन


शिवाय ही सारी नाती निभावताना आपल्याला तारेवरची कसरत करावीच लागते. खूप वेळा आपल्याच नात्यातील कोणतरी एखादे काका असतात, मामा असतात, कोणी अघळपघळ वागत, असतं कोणी स्वार्थी असतं, कोणी कामापुरता असत आणि कोणी अडचणीला देखील ऊभ राहत. परंतु आपल्याला ही नाती टिकवावी लागतात, त्यांना दुखवायचं नसतं, माहित असतं समोरच काका खोटं बोलत आहेत ,समोरचे मामा खोटं बोलत आहेत परंतु आपल्याला त्यांच्या हा ला हा मिळवावे लागते. आणि कधीकधी स्पष्ट परखड जर बोललं कींवा स्पष्ट परखड वागलं की मग लगेच बोलणारा वाईट असतो. अमका तमका ना खूप चांगला आहे, परंतु त्याची बायको मात्र वाईट आहे. ती कोणाला दारामध्ये उभं करत नाही. असं वगैरे वगैरे जेव्हा कोणी कोणाबद्दल म्हणतं, तेव्हा त्यामागे अशी गोष्ट असते की अमका तमका तुमच्या शब्दा मध्ये शब्द मिळवत असतो आणि त्याची बायको मात्र स्पष्ट परखड बोलते. म्हणून मंडळी कधीकधी एखादी गोष्ट पटत नाही, आवडत नाही, पण डोळेझाक करावी लागते. ऐकून न ऐकल्यासारखं करावं लागतं. तेव्हा कुठे ही नाती निभावली जातात.


Rate this content
Log in