नारीजन्मा तुझी कहाणी
नारीजन्मा तुझी कहाणी


नारीजन्मा तुझी कहाणी .नारीची कहाणी तिचे जीवन आगळेवेगळे.ऐका तिची कथा.
जेव्हा जन्माला येण्यासाठी सज्ज होते.तेव्हा तिच्या घरकुलातील माणसे मुलगी म्हणून भ्रूणहत्या तर करणार नाहीत?या प्रश्नाने अवघ्या विश्वात ती प्रवेश करते.जेव्हा जन्म होतो तेव्हा ते बाळ हसते लीला करते पण कसा स्विकार होईल तो प्रश्नच असतो. ज्या घरात ती जन्म घेते. तिथे मुलगा अपेक्षित असताना झाली ,आता परक्याचे खर्चिक धन की मुलगी धनाची पेटी म्हणून याचा परिणाम तिला सोसावा लागतो.परंतु मुलगी म्हणून जन्माला येणे ही निसर्गाची किमया असते
परक्याचे धन म्हणून कित्येक मर्यादा कळतनकळत तिच्यावर लादल्या जातात. शिकवणारा त्याचे विशाल मन दाखवतो पहा मुलगी असून तिच्या शिक्षणासाठी खर्च करतोय. मुक्त वातावरणात जन्माला आलेली नारी म्हणजे तिला लागलेली लॉटरीच.
सावित्रीची कास धरून शिक्षणाची कास धरली तरी मर्यादा असतातच हसतमुखाने नारी तिथून ही तिची वाटचाल करते. घरातील पुरुष वर्गाने लादलेल्या बंधनात बांधून घेते. पण स्वतंःचे कर्ते पण विसरत नाही. कितीही शिकली तरी चूलमूल चुकत नाही. म्हणून भातुकली च्या खेळापासून ,खेळातल्या जेवण बनवण्यापासून त्या संस्कारास सुरुवात होते.नव्हे तर तिच्यावर ते बिंबवले जाते.मग ती जाणती होते.एक आगळीवेगळी भावना जबाबदारी वाढल्याची, अनामिक भितीची पण वात्सल्याची. स्वकर्तृत्वाने पुढे जाताना आपणाला निर्भया,आसमा सारख्या भिषण दुर्देवी प्रसंगाला सामोरे जावे लागू नये याची भितीयुक्त काळजी घेणारी.
एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून ही पुढे जाणारी धैर्यवान नारी शिक्षिका, पायलट, वैमानिक, कवयित्री नव्हे तर रिक्षाचालकही होते. असे कोणतेच क्षेत्र ठेवत नाही की जिथे तिचे पाऊल नाही. कोणत्याही प्रसंगाने धडाडी कमी होत नाही. ती प्रसंगी दुर्गा, काली माता, सरस्वती, लक्ष्मी अशी विविध रुपे धारण करते. बनते राणी लक्ष्मीबाई, जिजाई, सावित्री,आनंदीबाई, सिंधूताई, कल्पना चावला ,मदर तेरेसा , इंदिरा गांधी ,आमटे घरांची शान अशा स्त्रिया ध्येयापोटी जगणार्या! असे आदर्श पहात मोठी मुलगी एका शुभमुहूर्तावर वडिलांकडून पतीच्या स्वाधीन होते.मुहूर्त की जन्मापासून मोठी झालेल्या घराशी तिची नाळ तुटते.त्या घरातून परकी होते.तिथे जायचे तर सासरची परवानगी घेणे आलेच.पटले तर ठिक नाहीतर घटस्फोट त्यावेळी स्त्रीलाच दोष. काही वेळा जातिवंत च्या नावावर तिथेच शेवट.
अशी स्री जन्माची कहाणी. कितिही शिकली तरीही उपेक्षित.
एकच आवाहन त्यागाच्या या मूर्तीला आता तरी न्याय द्या. चूलमूल सांभाळताना मदतीचा हाथ द्या. ते तिचेच काम नसून कुटुंबातील सर्वांचेच आहे हे समजा.स्री ही सहचारिणी असते. तसा मानसन्मान मिळू द्या. नराधमाच्या वासनेला बळी महिलांना सामावून घ्या. विधवा, वांझ यांचे दुःख समजून घ्या. ती माता आहे.. पुढील पिढीची जननी आहे.एक अविरत संग्राम आहे. अबला नसून सबला आहे